Rail Neer Price : रेल्वे विभागाची मोठी घोषणा!! आता स्वस्तात मिळणार ‘ही’ वस्तू

Published:
नुकतच भारत सरकारने जीएसटी स्लॅब मध्ये अनेक बदल करत काही वस्तूंवरील टॅक्स कमी केला आहे . त्याचा परिणाम हा रेल्वे मध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीच्या किमतीवर सुद्धा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Rail Neer Price : रेल्वे विभागाची मोठी घोषणा!! आता स्वस्तात मिळणार ‘ही’ वस्तू

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे… रेल्वेत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीची (Rail Neer Price) किंमत आता कमी करण्यात आली आहे. नुकतच भारत सरकारने जीएसटी स्लॅब मध्ये अनेक बदल करत काही वस्तूंवरील टॅक्स कमी केला आहे . त्याचा परिणाम हा रेल्वे मध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीच्या किमतीवर सुद्धा झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे मध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीची किंमत आता एक रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे विभागाने ट्विट करत माहिती दिली आहे.

कोणती बाटली किती रुपयांना?? Rail Neer Price

रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल नीरच्या १ लिटर बाटलीची किंमत १५ रुपयांवरून १४ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर ५०० मिली बाटली आता पूर्वीच्या १० रुपयांऐवजी ९ रुपयांना विकली जाईल. बाटलीच्या किमतीचे हे नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. सरकारने कमी केलेल्या जीएसटी चा फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे रेल नीर –

रेल नीर (Rail Neer Price) हा भारतीय रेल्वेचा स्वतःचा ब्रँड आहे, जो आयआरसीटीसी द्वारे उत्पादित आणि वितरित केला जातो. महत्वाची बाब म्हणजे हे नवीन दर फक्त रेल नीरवरच लागू होणार नाही, तर देशभरातील रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या विविध ब्रँडच्या इतर शॉर्टलिस्ट केलेल्या पाण्याच्या बाटल्यांना देखील लागू होईल असे परिपत्रकात नमूद केले आहे. विशेषतः प्रयागराज सारख्या मोठ्या आणि वर्दळीच्या रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल. प्रयागराज मध्ये दररोज सरासरी अंदाजे 30,000 ते 40,000 लिटर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो ज्यामध्ये रेल नीरचा वाटा मोठा आहे.

दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलने बुधवारी देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत काही मोठे बदल मंजूर केले. आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews