Marathi News

Railway Recruitment 2025 : रेल्वेत 1100 जागांची भरती; असा करा अर्ज

Published:
इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून १५ नोव्हेंबर २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Railway Recruitment 2025 : रेल्वेत 1100 जागांची भरती; असा करा अर्ज

रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2025) नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ईशान्य रेल्वेने (NER) अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 1100 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून १५ नोव्हेंबर २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे? निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पात्रता निकष – Railway Recruitment 2025

सूचनेच्या तारखेपर्यंत, म्हणजेच १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उमेदवारांनी हायस्कूल/१०वी उत्तीर्ण आणि आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांचे वय १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १५ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा

सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर, उमेदवारांनी होमपेजवर जाऊन संबंधित लिंकवर क्लिक करावे.
उमेदवारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करावी.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर, तो सबमिट करावा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, डाउनलोड करावे.
शेवटी प्रिंटआउट काढावे. (Railway Recruitment 2025)

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मॅट्रिक्युलेशन (किमान ५०% (एकूण) गुणांसह) आणि आयटीआय परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल, ज्यामध्ये दोघांनाही समान महत्त्व दिले जाईल. याद्वारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews