Marathi News

आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त चिपळूण-पनवेल दरम्यान अनारक्षित अतिरिक्त सेवा, प्रवाशांना दिलासा

Written by:Astha Sutar
Last Updated:
प्रवाशांना रेल्वे गाड्या अधिक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मध्य रेल्वेनं प्रवासाना दिलासा दिला आहे. यासाठी गणेश भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे चिपळूण व पनवेल दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त चिपळूण-पनवेल दरम्यान अनारक्षित अतिरिक्त सेवा, प्रवाशांना दिलासा

Chiplun-Panvel Railway – गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात कोकणवासिय कोकणात गणपती सणाला गावी गेले  आहेत. पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे. त्यामुळं आता गावी गेलेले चाकरमानी  यांचा परतीच्या प्रवास सुरु आहे. मोठ्या गणपतीचे अर्थातच अनंत चतुर्थी या दिवशी विसर्जन होणार आहे. शनिवारी मोठ्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. पण गणपतीसाठी गावी गेलेल्या चाकरमानी यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना रेल्वे गाड्या त्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी मध्य रेल्वेनं प्रवासाना दिलासा दिला आहे. यासाठी गणेश भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे चिपळूण व पनवेल दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाड्यांची वेळ काय आहे?

दरम्यान, 01160 अनारक्षित विशेष गाडी ०४.०९.२०२५ रोजी चिपळूण येथून ११.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे १६.१० वाजता पोहोचेल. तर 01159 अनारक्षित विशेष गाडी ०४.०९.२०२५ रोजी पनवेल येथून १६.४० वाजता सुटून त्याच दिवशी चिपळूण येथे २१.५५ वाजता पोहोचेल. या सर्व गाड्यांचे थांबे हे सोमटने, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कलंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी या ठिकाणी असणार आहेत.

तिकिट व अधिक माहिती कुठे मिळणार?

या गाड्यांची संरचना  ८ मेमू कोच अशी असणार आहे. तर प्रवाशांना विनंती आहे की, वरील गाड्या अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार असून, प्रवास तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील. या तिकिटांसाठी सुपरफास्ट मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना लागू असणारेच सामान्य भाडे आकारले जाईल. आणि सविस्तर वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असं रेल्वेकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews