Ahilyabai Holkar Death Anniversary : अहिल्याबाई होळकरांचा इतिहास समजून घ्यायचाय? या ४ ठिकाणांना भेटी देणं Must

Written by:Smita Gangurde
Published:
स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित नसतं तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं आणि समाजाच्या उन्नती-प्रगतीसाठी लढू शकतं याचं याची देही याची डोळा दर्शन घडविणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी.
Ahilyabai Holkar Death Anniversary : अहिल्याबाई होळकरांचा इतिहास समजून घ्यायचाय? या ४ ठिकाणांना भेटी देणं Must

स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित नसतं तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं आणि समाजाच्या उन्नती-प्रगतीसाठी लढू शकतं याचं याची देही याची डोळा दर्शन घडविणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी. (13 ऑगस्ट १७९५) अहिल्याबाई होळकरांची यंदाच्या वर्षी २०२५ मध्ये ३०० वी जयंती साजरी केली जात असताना, त्यांच्या पुण्यतिथीला २३० वर्षे पूर्ण झाले आहेत. आताच्या अहिल्यानगरमधील चौंडी या गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला.

अहिल्याबाई होळकर या एक मराठा शासक होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामं केली आहेत. अठराव्या शतकातील भारतातील स्त्रियांना सर्वच बाबतीत निर्बंध होते. त्यांना घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र या काळात अहिल्याबाई उभ्या राहिल्या आणि महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रकारे काम सुरू केलं. आज मध्य प्रदेशातील महेश्वरी साडीचं विशेष नाव आहे. या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसह गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांच्यासाठी जरी हा व्यवसाय असला तरी यामुळे मोठी सामाजिक क्रांती घडून आली होती.

एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तिमत्त्वाविषयी वाचण्याव्यतिरिक्त त्याने घडवलेली ठिकाणांचं पर्यटन करणं अधिक संयुक्तिक ठरतं.

अहिल्याबाईंना समजून घ्यायचं असेल तर ही ५ ठिकाणं फिरणं मस्ट

1 अहिल्यादेवींचं जन्मस्थळ चौंडी (अहिल्यानगर)

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या आधीचं अहमदनगर आणि आताचं अहिल्यानंतर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील. अहिल्यादेवी यांचं आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी गाव.

अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृतींच्या माध्यमातून उभारलेली चित्र सृष्टी या ठिकाणी पहायला मिळते. शासनाच्या वतीने त्यांच भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. याच पुतळ्याच्या मागील बाजूस त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व जीवनातील प्रमुख घटना सांगणारे शिल्प तयार करण्यात आले असून त्यावर त्यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांची न्यायप्रियता उल्लेखीत करणारे, मुरब्बी प्रशासक म्हणून त्यांची ओळख ज्या घटनांमुळे झाली त्या घटना व अशा अनेक महत्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचे चित्ररुपी वर्णन केलेले आहे.

२ मध्य प्रदेशातील महेश्वर – अहिल्याबाईंची समाधी

१३ ऑगस्ट १७९५ रोजी राणी अहिल्यादेवी यांचं मध्य प्रदेशातील महेश्वर येथे निधन झालं. त्यामुळे त्यांचं समाधीस्थळ बांधण्यात आलं आहे. त्यांची समाधी “अहिल्येपुर छत्री मंदिर यानावाने सुप्रसिद्ध आहे. ही वास्तू प्रचंड मोठी असून नर्मदेच्या किनारी आहे. होळकरशाहीची दुसरी राजधानी किल्ले महेश्वर याच्या पायथ्याशी अहिल्याबाईंना दहन करण्यात आलं.

येथे महेश्वरी साड्या, कापड याचा मोठा उद्योग आहे. महेश्वरमध्ये प्रत्येक घरामध्ये आजही हा उद्योग चालवला जातो. देशातील पर्यटकांसह परदेशी पर्यटकांमध्येही महेश्वर कापड आणि साड्यांबाबत क्रेश आहे.

३ ओंकारेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात अहिल्याबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका

ओंकारेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच्या जीर्णोद्धारात अहिल्याबाईंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ओंकारेश्वर हे देवस्थान मध्य प्रदेशात असून तेदेखील नर्मदेच्या काठावर वसलेलं आहे. अहिल्याबाईंनी या मंदिर परिसरात बरंच काम केलं, भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या. मंदिर परिसरात घाट, रस्ते आणि इतर गोष्टींची उभारणी केली.

४ जेजुरीतील अहिल्याबाईंचा वाडा

अहिल्याबाईंनी देशातील मंदिरांना संरक्षण दिलं. मुघलांनी अनेक मंदिरं पाडली होती, प्रामुख्याने त्याच्या जीर्णोद्धाराचं काम अहिल्याबाईंनी केलं. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरासाठीही अहिल्याबाईंनी बरंच काम केलं. जेजुरी हे होळकर घराण्याचं कुलदैवत होय. त्यामुळे एकंदर होळकर घराण्याने मंदिरासाठी बरंच काम केलं. १७७० रोजी अहिल्याबाईंनी जेजुरी गडाच्या किल्लेसदृश्य तटबंदीची निर्मिती केली. पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडे तटबंदीवरही होळकरांचे शिलालेख आढळतातय

 

Follow Us :GoogleNews