Marathi News

आरोग्यासाठी गुणकारी असतात उकडलेले शेंगदाणे, सांधेदुखीपासून ते हिमोग्लोबीन वाढवण्यापर्यंत आहेत अनेक फायदे

Published:
उकडलेले शेंगदाणे अनेकांना आवडतात. उकडलेले शेंगदाणे खाण्यास चविष्ट तर असतातच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
आरोग्यासाठी गुणकारी असतात उकडलेले शेंगदाणे, सांधेदुखीपासून ते हिमोग्लोबीन वाढवण्यापर्यंत आहेत अनेक फायदे

Benefits of eating boiled peanuts:   लहान असो किंवा वृद्ध जवळजवळ सर्वांनाच शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे नक्कीच खाल्ले असतील. पण, तुम्ही कधी उकडलेले शेंगदाणे खाल्ले आहेत का?

उकडलेले शेंगदाणे खाण्यास चविष्ट तर असतातच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. त्यात प्रथिने, नैसर्गिक साखर, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त सारखे पोषक घटक असतात. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या संशोधनानुसार, शेंगदाणे उकळून खाल्ल्याने त्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांचे फायदे चार पटीने वाढतात.

तुम्ही उकडलेले शेंगदाणे नाश्त्यात खाऊ शकता किंवा जेवणात खाऊ शकता. उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. यामुळे शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा होतो आणि ऊर्जा मिळते. चला जाणून घेऊया उकडलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे काय आहेत…

 

हिमोग्लोबिनची पातळी वाढवते-

उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने अशक्तपणाची समस्या दूर होते. खरंतर, शेंगदाण्यामध्ये भरपूर लोह असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. यासोबतच शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जा प्रदान करतात. यामुळे व्यक्ती दिवसभर उत्साही राहते.

 

डोळे निरोगी राहतात-

उकडलेले शेंगदाणे खाणे आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने दृष्टी सुधारते. खरं तर, शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 6 असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. हिवाळ्यात सकाळी उकडलेले शेंगदाणे खा, यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतील.

 

सांधेदुखीपासून आराम-

उकडलेले शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. शेंगदाणे आणि गुळामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने सांधे आणि हाडांच्या दुखण्याची समस्या दूर होते. संधिवाताच्या रुग्णांसाठी उकडलेले शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर आहे.

 

वजन कमी करण्यास उपयुक्त-

उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही उकडलेले शेंगदाणे खाऊ शकता. खरंतर, उकडलेल्या शेंगदाण्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे चयापचय वाढतो आणि शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते. यासोबतच उकडलेले शेंगदाणे खाल्ल्याने आतडे स्वच्छ होतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews