Chankaya Niti : प्राण्यांपासून शिका या गोष्टी; आयुष्यात मिळेल अफाट यश

Published:
प्राण्यांच्यात सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मनुष्याने स्वतःच्या अंगी बाळगल्या तर अतिशय कमी वेळेत तुम्हाला यश मिळू शकते.
Chankaya Niti : प्राण्यांपासून शिका या गोष्टी; आयुष्यात मिळेल अफाट यश

भारतीय इतिहासाचे महान विद्वान आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीमध्ये (Chanakya Niti) मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याचे अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाने काय करावं? कशाप्रकारे काम करावं याबाबत चाणक्यांनी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. चाणक्यांचा असा विश्वास होता की केवळ शास्त्रांमधूनच नव्हे तर प्राणी आणि पक्ष्यांच्या गुणांमधून देखील जीवनात योग्य मार्ग शिकता येतो. प्राण्यांच्यात सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मनुष्याने स्वतःच्या अंगी बाळगल्या तर अतिशय कमी वेळेत तुम्हाला यश मिळू शकते.

1) सिंह – Chanakya Niti

सिंह हा जंगलाचा राजा….सिंह जेव्हा जेव्हा शिकार करतो तेव्हा तो पूर्ण शक्ती आणि गांभीर्याने असे करतो. त्याचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत तो कधीही हार मानत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही तो माघार घेत नाही. सिंहाकडून शिकण्याचा हाच गुण की जेव्हा आपण एखादं टारगेट फिक्स करतो तेव्हा काही झालं तरी त्यात हार म्हणायचं नाही. तिथे अडचणी आल्या तरी माघार घ्यायची नाही आणि एक दिवस नक्कीच आपले ध्येय पूर्ण करायचे.

2) गाढव

खरंतर आपण गाढवाला नावे ठेवतो कोणी चुकीचे काम केले तर त्याला गाढवाची उपमा देतो मात्र चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) गाढवाच्या अंगी असे अनेक गुण आहेत जे मनुष्याने स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजे.  गाढवाने कितीही वजन उचलले तरी ते त्याला त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवत राहते. ऊन वारा पाऊस कशीही परिस्थिती असली तरी गाढव त्याच्या पाठीवरील ओझं वाहत वाहत पोहोचतेच. गाढवाकडून आपण कठोर परिश्रम आणि संयमाने प्रत्येक अडथळ्यावर मात कशी करायची हे शिकू शकतो.

3) गरुड

आचार्य चाणक्य म्हणतात की गरुडाचा संयम आणि त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे उल्लेखनीय आहे. तो कितीही वेळ वाट पाहत असला तरी, त्याच्या शिकारवरील पकड कधीही सैल होत नाही. हा गुण आपल्याला सांगतो की यशासाठी संयम आणि एकाग्रता आवश्यक आहे. एक दिवस नक्कीच तुम्हांला यश मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews