डोळ्यांखालची काळी वर्तुळे आपोआप दूर होतील, फक्त फॉलो करा ‘हे’ मॉर्निंग रुटीन

Published:
जर तुम्ही सकाळी उठून निरोगी दिनचर्या पाळली तर तुम्ही ही काळी वर्तुळे दूर करू शकता.
डोळ्यांखालची काळी वर्तुळे आपोआप दूर होतील, फक्त फॉलो करा ‘हे’ मॉर्निंग रुटीन

 Home Remedies for Dark Circles Under the Eyes:  आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबत त्वचेवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. चमक कमी होते आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशीच एक समस्या म्हणजे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे. जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल, झोपेची कमतरता असेल, जास्त ताणतणाव असेल किंवा तुमच्या त्वचेची काळजी घेतली नसेल तर काळी वर्तुळे येऊ शकतात.

काळी वर्तुळे कधीकधी, पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा आजारपणामुळे होऊ शकतात. परंतु, जर तुम्ही सकाळी उठून निरोगी दिनचर्या पाळली तर तुम्ही ही काळी वर्तुळे टाळू शकता. आज आपण या दिनचर्येबद्दल जाणून घेऊया…..

सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल वापरू नका-
आजकाल, बहुतेक लोकांना जागे झाल्यानंतर लगेच मोबाईल फोन वापरण्याची सवय आहे. परंतु, ही सवय काळी वर्तुळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. जागे झाल्यानंतर लगेच ब्ल्यू रेझच्या संपर्कात आल्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. यामुळे कोरडेपणा, खाज आणि जळजळ होऊ शकते. यामुळे डोळ्यांखाली सूज आणि काळी वर्तुळे देखील येऊ शकतात.

थंड पाण्याने डोळे धुवा –
सकाळी उठल्यानंतर,सर्वात आधी तुमचे डोळे थंड स्वच्छ पाण्याने धुवा. यासाठी, तोंडात पाणी धरा आणि तुमचे डोळे थंड पाण्याने ८ ते १० वेळा स्वच्छ धुवा. हे तीन वेळा करा.

डोळ्यांना मसाज करा –
चेहरा धुतल्यानंतर, तुमच्या डोळ्यांना मसाज करायला विसरू नका. तुम्ही डोळ्यांखाली कोणतीही क्रीम किंवा मॉइश्चरायझर वापरू शकता. सुमारे १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काळी वर्तुळे कमी होतील आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल.

आय मास्क लावा –
या रुटीनच्या शेवटी, तुम्ही घरगुती किंवा आयुर्वेदिक आय मास्क वापरावा. यासाठी तुम्ही घरातील सोपे उपाय वापरू शकता. महत्वाचं म्हणजे आठवड्यातून फक्त तीन वेळा आय मास्क वापरावा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews