दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ (Diwali 2025 Recepie) आलेच. चकली, चिवडा, लाडू यांसारखे पारंपरिक पदार्थ तर आपण दिवाळीनिमित्त बनवतोच. परतू आणखी वेगळ काहीतरी बनवण्याची तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास अशी रेसिपी सांगणार आहोत. तुम्हांला जर गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. कारण, ब्रेडचे गुलाबजाम अगदी काही मिनिटात बनवून तयार होतात आणि यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावे लागत नाही. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.
गुलाबजामचा पाक बनवण्याचे साहित्य – Diwali 2025 Recepie
2 वाटी साखर, 2 मोठे ग्लास पाणी, 2 टी स्पून वेलची पावडर
गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य
1 पॅकेट ब्रेड स्लाइसचे 1 कप दूध, काजूचे तुकडे, केशरतूप वा तेलबदाम, पिस्ता सजावटीसाठी
पाक बनवण्याची कृती
सर्वात आधी एका कडईत साखर व पाणी एकत्र करून मंद आचेवर पाक बनवण्यासाठी ठेवा. हा पाक लगेच 5 ते 7 मिनिटांत तयार होईल. तो तयार झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि केसर घाला आणि गॅस बंद करून भांडे झाकून ठेवा. Diwali 2025 Recepie
गुलाबजाम बनवण्याची कृती
– गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात प्रथम ब्रेडच्या चारी बाजूच्या कडा कापून घ्या. आणि मधला पाव बाजूला काढा.
– यानंतर या पावाचे तुकडे करून त्याचा चुरा करा. पुढे या चुऱ्यामध्ये थोडे थोडे दूध घालून हा चुरा पिठासारखा मळून घ्या. पीठ सैल आणि घट करू नका. हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला पाच मिनिटे बाजूला ठेवा.
– मळलेल्या पिठाचे नंतर छोटे छोटे गोळे करा. या गोळ्यांमध्ये काजूचे बारीक तुकडे घाला. त्यानंतर व्यवस्थितरित्या हे गोळे गोल बनवा.
– सर्व गोळे बनवून झाल्यानंतर कढईमध्ये मंद आचेवर तेल किंवा तूप तापवून हे गोळे त्यात टाका. आणि ते व्यवस्थित तळून घ्या.
– हे गोळे तळल्यानंतर त्यांना साखरेच्या बनवलेल्या पाकामध्ये टाका. पाच मिनिटे तरी हे गोळे साखरेच्या पाकातच असू द्या.
– यानंतर गोळे आणि पाक एका काचेच्या बाऊलमध्ये काढा आणि त्यावर बदाम किंवा पिस्ता चिरून घाला. अशा पद्धतीने तुमचे झटपट ब्रेडचे गुलाबजाम तयार असतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






