Marathi News

Diwali Recipes: तुम्हालाही गोड पदार्थ आवडत नाहीत? मग दिवाळीला बनवा तिखट शंकरपाळे

Published:
दिवाळीत फराळाला विशेष महत्व असते. यामध्ये लाडू, चिवडा, चकली, करंज्यासोबत शंकरपाळे असे विविध पदार्थ समाविष्ट असतात.
Diwali Recipes: तुम्हालाही गोड पदार्थ आवडत नाहीत? मग दिवाळीला बनवा तिखट शंकरपाळे

Spicy Shankarpale Recipe:  भारतात विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. त्यातीलच सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी होय. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीची जय्यत तयारी सुरु आहे. कपडे खरेदीपासून ते घर सजावटीपर्यंत सर्वकाही केले जात आहे. तर दुसरीकडे घरोघरी महिला फराळ बनवत आहेत.

दिवाळीला फराळाला विशेष महत्व असते. यामध्ये लाडू, चिवडा, चकली, करंज्यासोबत शंकरपाळे असे विविध पदार्थ समाविष्ट असतात. काहींना गोड खायला आवडते तर काहींना तिखट आणि नमकीन पदार्थच आवडतात. ज्या लोकांना गोड पदार्थ आवडत नाहीत त्यांच्यासाठी आज आपण खास तिखट रेसिपी पाहणार आहोत.

अनेकजण शंकरपाळे आवडीने खातात पण काहीजण गोड असतात म्हणून खाणे टाळतात. परंतु तिखट शंकरपाळेसुद्धा बनवता येतात. आज आपण तिखट शंकरपाळे बनवण्याची एकदम सोपी रेसिपी जाणून घेऊया…..

 

तिखट शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

२ कप गव्हाचे पीठ

२ टेबलस्पून बारीक रवा

४ टेबलस्पून तेल, मोहन करिता

१ टीस्पून ओवा

१ टेबलस्पून तीळ

१ टीस्पून भाजलेली जीरे पूड

१ टीस्पून तिखट

चवीनुसार मीठ

१/२ टीस्पून हिंग

तळण्यासाठी तेल

 

तिखट शंकरपाळे बनवण्याची रेसिपी-

 

तिखट शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत गव्हाचे पीठ घ्या.

आता या पिठामध्ये रवा, तीळ, जिरे, मीठ, ओवा, हिंग, अशाप्रकारे सर्व जिन्नस घाला.

हे सर्व जिन्नस हाताने चांगले एकत्र करून घ्या. आता तेल गरम करून तेलाचे मोहन त्यात टाका.

आता थोडे-थोडे गरम पाणी टाकून हाताने पीठ चांगले मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळू नका . मळलेल्या कणकेवर थोडे तेल सोडून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

आता पुन्हा एकदा कणिक मळून सैल करून घ्यावी. नंतर त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून पारी लाटून घ्यावी.

त्यांनंतर त्याला शंकरपाळेच्या आकारात कापून तेलात चांगले तळून घ्यावे. अशाप्रकारे खुसखुशीत शंकरपाळे तयार आहेत.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews