Malai Pedhe Recipe: घराघरात दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. महिला फराळ बनवण्यासाठी घाई करत आहेत. फराळामध्ये चिवडा, लाडू, करंज्या, चकली यांसारखे पारंपरिक पदार्थ तर बनवले जातातच. परंतु अनेक वेगवेगळे पदार्थही ट्राय केले जातात. यामध्ये तिखट आणि चटपटीत पदार्थांपासून अनेक गोड पदार्थांचा समावेश असतो.
तुम्हालाही यंदा दिवाळीनिमित्त काहीतरी नवीन ट्राय करायचे असेल, तर तुम्ही मलाई पेढे ट्राय करू शकता. बेसनाचे लाडू तर नेहमीच बनवतो. परंतु त्यासोबत यंदा मलाई पेढे बनवले तर सर्वजणच कौतुक करतील. त्यासाठी आपण अगदी सोपी रेसिपी जाणून घेऊया….
तुम्हालाही गोड पदार्थ खाण्याची आवड असेल आणि सतत तुम्ही बेकरीमधून मिठाई आणत असाल, तर आता घरातच एक रेसिपी ट्राय करू शकता. आज आपण मलई पेढा बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी बनवायला तर सोपी असतेच शिवाय कमी साहित्यात बनवता येते…..
मलई पेढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
१ लिटर दूध
८०-१०० ग्रॅम साखर
वेलची पूड
बारीक चिरलेले पिस्ता
मलाई पेढा बनवण्याची रेसिपी-
घरात मलाई पेढा बनवण्यासाठी, एक लिटर फुल क्रीम दूध घ्या. एक मोठे पॅन घ्या आणि त्यात दूध हलवत गरम करा. दूध उकळत ठेवा. पॅनच्या बाजूला क्रीम काढून टाकत रहा. दुधापासून मावा तयार करा.
आता त्यात २५० ग्रॅम साखर घाला. मावा तयार झाल्यावर तो संपूर्ण पॅनवर पसरवा. हा मावा पूर्णपणे पांढरा दिसेल. मावा ५-७ मिनिटे थंड होऊ द्या. आता त्यात एक किंवा दोन चिमूटभर वेलची पावडर घाला आणि मिक्स करा. छोटे-छोटे गोळे बनवून पेढे बनवा.
पेढे बनवल्यानंतर, बारीक चिरलेल्या पिस्त्यांनी सजवा. मलाई पेढा तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या ड्रायफ्रुट्सनेही सजवू शकता. त्यावर केशर देखील लावू शकता.
यंदा दिवाळीला हा पदार्थ नक्की ट्राय करा. हे पेढे सर्वांना खूप आवडतील.






