Marathi News

हिवाळ्यात सतत घसा खवखवतो? आराम मिळवण्यासाठी प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक

Published:
सकाळी उठून सर्वात आधी काही आयुर्वेदिक ड्रिंक घेतल्याने तुमचा घसा शांत होऊ शकतो आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळू शकते.
हिवाळ्यात सतत घसा खवखवतो? आराम मिळवण्यासाठी प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक

Ayurvedic remedies for sore throat:   हिवाळ्यात घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे. थंड वारे,संसर्ग, धूळ किंवा बदलत्या हवामानामुळे असे होते. ही समस्या विशेषतः कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या किंवा खूप थंड पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये सामान्य आहे. घसा खवखवण्याकडे दुर्लक्ष केल्याने खोकला, घशाला सूज आणि अगदी ताप यासारख्या समस्या होऊ शकतात.

सकाळी उठून सर्वात आधी कोमट पाणी पिण्याऐवजी, काही आयुर्वेदिक पेये घेतल्याने तुमचा घसा शांत होऊ शकतो आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. या ड्रिंक्समधील औषधी वनस्पती घशातील संसर्ग कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि दिवसभर ताजेतवाने वाटण्यास मदत करतात.चला जाणून घेऊया हे ड्रिंक्स कोणते आहेत…..

आले आणि लिंबाचे ड्रिंक-
आल्यामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. जे घशाच्या संसर्गाशी लढतात. लिंबूमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि घशाला आराम देते. हे ड्रिंक घशाला मॉइश्चराइझ करण्यास, श्लेष्मा मोकळा करण्यास आणि थंड घशातील खवखव दूर करण्यास मदत करते. ते शरीरातील विषारी पदार्थ देखील काढून टाकते.

हळद आणि तुळशीचे ड्रिंक-
हळद ही एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे जी घशातील खवखव कमी करते. आणि सूजदेखील कमी करते. तुळस घशाला आराम देते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. हे पेय केवळ घशाला आराम देते असे नाही तर सर्दी आणि खोकला रोखण्यास देखील मदत करते. ते शरीराला आतून उबदार करते आणि मनाला शांत करते.

काळी मिरी आणि लवंगचे ड्रिंक-
काळ्या मिरीमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे घशाची जळजळ आणि संसर्ग कमी करतात. लवंग घशाला आराम देते आणि वेदना कमी करते. ते पचन सुधारते आणि शरीर उबदार ठेवते.जे हिवाळ्यात फायदेशीर आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews