Marathi News

रात्री नेमकं झोपतानाच खोकला येतो? ‘हे’ घरगुती उपाय घशाला देतील आराम

Published:
कधीकधी नेमका रात्री खोकला वाढतो. त्यामुळे पुरेशी झोप मिळण्यास त्रास होतो.
रात्री नेमकं झोपतानाच खोकला येतो? ‘हे’ घरगुती उपाय घशाला देतील आराम

Home remedies for dry cough at night:   बदलत्या हवामानासोबत आपल्या सर्वांनाच विविध आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे सर्दी आणि खोकला. बदलत्या हवामानात बहुतेक लोकांना खोकल्याचा त्रास होतो. शिवाय, सर्दीमुळे घसा खवखवण्याचा त्रास देखील होतो.

परंतु कधीकधी नेमका रात्री खोकला वाढतो. झोपेच्या वेळीही अनेकांना खोकला येतो. यामुळे पुरेशी झोप मिळण्यास त्रास होतो आणि अस्वस्थता वाढते. जर तुम्हालाही रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर हे उपाय करून पहा…..

मधाचे सेवन करा-
रात्री खोकला त्रास देत असेल तर, तुम्ही झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत.जे खोकला कमी करण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी मध चाटणे खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही आल्याच्या रसात मध मिसळून देखील पिऊ शकता. यामुळे कफचे प्रमाण कमी होईल आणि सर्दी कमी होण्यास मदत होईल.

झोपण्यापूर्वी वाफ घ्या-
जर तुम्हाला खोकला किंवा सर्दी होत असेल तर झोपण्यापूर्वी नक्कीच वाफ घ्या. यामुळे झोपताना खोकला येणार नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यासही मदत होईल. म्हणून, या ऋतूत झोपण्यापूर्वी वाफ घेणे फारच फायदेशीर आहे.

आल्याचे सेवन करा-
जर तुम्हाला रात्री तीव्र खोकला येत असेल तर झोपण्यापूर्वी आल्याचे सेवन करण्याचा विचार करा. आल्यामुळे कोरडा किंवा श्लेष्मा निर्माण करणारा खोकला कमी होतो. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे विषाणूजन्य संसर्ग दूर करण्यास मदत करतात. आल्यामुळे शरीराचा थकवा आणि वेदना कमी होण्यास देखील मदत होते. झोपण्यापूर्वी तुम्ही आल्याचा तुकडा चावू शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता.

ग्रीन टी-
जर तुम्हाला रात्री सर्दी किंवा खोकल्याचा जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ शकता. झोपण्यापूर्वी कोमट ग्रीन टी प्या. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे संसर्ग कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टी पिल्याने वारंवार येणारा खोकला थांबण्यास देखील मदत होते.]

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews