Benefits of drinking milk tea with fennel seeds: जवळपास प्रत्येक भारतीय घरांमध्ये दुधाचा चहा पिला जातो. दुधाचा चहा पिल्याने ताण आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. पण दुधाचा चहा पिल्यानंतर अनेकांना पित्त आणि गॅसचा त्रास होतो. काही लोक आले घालून दुधाचा चहा पितात, तर काही हिरवी वेलची घालून पितात.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो बडीशेप घालूनदेखील पिऊ शकता. बडीशेप घालून दुधाचा चहा पिणे अत्यंत फायदेशीर आहे. बडीशेप घालून चहा पिल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि पचन सुधारते. पित्त स्वभावाच्या लोकांसाठी देखील हे फायदेशीर आहे. आज आपण बडीशेप घालून दुधाचा चहा पिण्याचे फायदे जाणून घेऊया….
आम्लपित्त कमी करते –
दुधाच्या चहामध्ये बडीशेप मिसळून पिल्याने अपचन, गॅस आणि आम्लपित्त यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. दररोज या चहाचे सेवन केल्याने पोट आणि छातीत जळजळ कमी होते. जर तुम्हाला वारंवार आम्लपित्त होत असेल, तर तुम्ही चहात बडीशेप घालून पिऊ शकता.
पोटातील उष्णता कमी करते –
पित्त प्रकृती असलेल्या लोकांना अनेकदा पोटात उष्णता जाणवते. परिणामी, त्यांना पोट आणि छातीत जळजळ होते. जर तुम्हालाही पोटात उष्णता जाणवत असेल, तर तुम्ही दुधाच्या चहामध्ये बडीशेप मिसळून पिऊ शकता. बडीशेप पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
पचन सुधारते –
बडीशेप पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बडीशेप घालून दुधाचा चहा पिल्याने पचन सुधारते. पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी, तुम्ही दुधाच्या चहामध्ये बडीशेप घालू शकता. बडीशेप पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता आणि अपचन कमी करते.
पोट फुगणे कमी करते –
बडीशेपमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. जे शरीरातील जळजळ कमी करण्यास प्रभावी असतात. जर तुम्हाला पोटात कोणत्याही प्रकारची सूज असेल तर बडीशेप मिसळून दुधाचा चहा पिणे फायदेशीर ठरू शकते. दुधाचा चहा पिल्याने पोटातील सूज कमी होण्यास मदत होते. परंतु, जर तुम्हाला पोटात तीव्र सूज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घ्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






