श्रीगणेशाला प्रिय असणाऱ्या दुर्वाचे औषधी गुणधर्म, त्वचेपासून-पोटाच्या समस्यांपर्यंत आहेत अनेक फायदे

Published:
दुर्वाचे धार्मिक महत्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु अनेकांना दुर्वाचे औषधीय महत्व माहिती नसेल.
श्रीगणेशाला प्रिय असणाऱ्या दुर्वाचे औषधी गुणधर्म,  त्वचेपासून-पोटाच्या समस्यांपर्यंत आहेत अनेक फायदे

Medicinal benefits of Durva:    सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे बाप्पाला प्रिय असणाऱ्या गोष्टी घरामध्ये दिसून येतात. यामध्ये मोदकांचा तर समावेश आहेच. शिवाय आणखी एका गोष्टीचा आवर्जून समावेश असतो. आणि ती गोष्ट म्हणजे दुर्वा होय. दररोज गणपती बाप्पाला हिरवागार दुर्वा आवर्जून वाहिला जातो. श्रीगणेशाला दुर्वा फार प्रिय आहे.

दुर्वाचे धार्मिक महत्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु अनेकांना दुर्वाचे औषधीय महत्व माहिती नसेल. तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल गणपती बाप्पाला वाहिला जाणारा दुर्वा अत्यंत औषधी आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक आरोग्य समस्यांमध्ये दुर्वाचा वापर केला जातो. आज आपण दुर्वाचे विविध आरोग्य फायदे जाणून घेऊया….

 

शरीर स्वच्छ करण्यास उपयुक्त-

अलीकडे आपण बॉडी डिटॉक्सबाबत अनेकवेळा ऐकतो. तुम्हाला माहिती आहे का दुर्वा हा नैसर्गिक डिटॉक्सीफायर आहे. दुर्वाचा रस सेवन केल्यास शरीरातील घाण निघून जाते. शिवाय सर्व विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात दुर्वाचा रस पिणे फायदेशीर असते.

 

पचनक्रिया सुधारते-

दुर्वा हा पोटाच्या समस्यांमध्येसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. अनेकांना सतत पोटाच्या तक्रारी होत असतात. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, गॅस अशा अनेक समस्या होतात. पोटाच्या या तक्रारी दूर करण्यासाठी दुर्वा खाणे फायदेशीर ठरतो.

 

मधुमेह नियंत्रित करते-

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. दुर्वामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी दुर्वाचा रस पिल्याने साखर नियंत्रित होण्यास मदत मिळते.

 

रक्तस्त्राव थांबवते-

अनेकदा नाकातून रक्त येते. विशेषतः उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या असते. अशावेळी दुर्वाचा रस काढून नाकात दोन थेंब घालणे फायदेशीर ठरते. दुर्वामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात.

 

त्वचेसाठी उपयुक्त-

त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी दुर्वा अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी दुर्वाचा लेप करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा नितळ आणि चमकदार बनतो. तसेच त्वचेच्या समस्याही दूर होतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews