Benefits of Garba for Mental Health: सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरु आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गा मातेची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीमध्ये आवर्जून खेळाला जाणारा पारंपरिक नृत्य म्हणजे गरबा होय. गरब्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व तर आहेच. शिवाय गरब्याला आरोग्यविषयक महत्वसुद्धा आहे. डॉ. श्वेता छाब्रा यांनी याबाबत सांगितले आहे.
डॉ. छाब्रा सांगतात की, गरबा खेळणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर आहे. छाब्रा यांच्या मते, एक तास गरबा खेळल्याने जवळपास ४०० ते ६०० कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय तुमच्या मानसिक स्थितीतसुद्धा सकारात्मक बदल दिसून येतो.
गरबाच्या फायद्याबाबत बोलताना डॉ. छाब्रा सांगतात की, गरब्यामध्ये होणाऱ्या हातांच्या हालचालींमुळे शरीराचे अनेक स्नायू मजबूत होतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते. तुमच्यामधील ऊर्जा वाढते. शिवाय तुमच्या कॅलरीज बर्न होऊन अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांना याचा विशेष फायदा होतो.
मानसिक आरोग्य सुधारते-
डॉ. श्वेता छाब्रा सांगतात की, गरबा खेळल्याने शरीरातील डोपामाइन आणि आनंद सम्प्रेरके वाढतात. तस्सेच कार्टिसोल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा मूड चांगला होतो. तुमचा ताणतणाव दूर होऊन तुम्ही आनंदी होता. त्यामुळे एक तास गरबा खेळणे अगदी उत्तम असते. गरब्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात.
गरबा खेळताना काळजी घेणे आवश्यक-
डॉ. छाब्रा म्हणतात की, गरबा खेळताना तुम्ही हायड्रेटेड असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही तास आधी ताक, नारळ पाणी, पाणी, लिंबू पाणी अशी पेये प्यावीत. तसेच उपवास असणाऱ्यांनी फळे, साबुदाणा खिचडी, यांसारखे पदार्थ खावेत. तसेच जमेल तसे थोडा-थोडा ब्रेक घेऊन खेळावे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






