जपानमध्ये पारंपरिक चहाचा एक भाग असलेली माचा टी आता जागतिक आरोग्य आणि वेलनेस तज्ज्ञांची आवडती ड्रिंक बनली आहे. बारिक दळून तयार करण्यात आलेल्या ग्रीन टीच्या या रूपात आरोग्यवर्धक गुण भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळेच आज ती ‘सायन्स इन अ कप’ म्हणूनही ओळखली जाते. चला तर पाहूया माचा टीने हेल्थ वर्ल्डमध्ये कसे स्थान निर्माण केले आहे.
संपूर्ण चहाचे पोषकतत्त्व एका कपात
माचा टीची खासियत म्हणजे हे चहाचे संपूर्ण पाने बारिक करून तयार केले जाते. त्यामुळे ग्रीन टीपेक्षा यात अधिक प्रमाणात कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचमुळे माचा टीला आरोग्यदायी पर्याय मानले जाते.
तणाव कमी आणि एकाग्रता वाढवणारी
माचामध्ये एल-थीनिन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे मेंदूला शांत ठेवण्यास मदत करते. हे कॅफिनचा परिणाम संतुलित करतं, त्यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते पण घबराट किंवा चिडचिड जाणवत नाही. या संयोजनामुळे मानसिक स्थैर्य आणि चांगली फोकसही मिळतो.
मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यास मदत
माचा टी एक नैसर्गिक मेटाबॉलिझम बूस्टर आहे. यामध्ये असणारे कॅटेचिन्स शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देतात. त्यामुळे शरीरातील चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते आणि वजन नियंत्रणात राहते.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणारे
माचाचा गडद हिरवा रंग यामधील क्लोरोफिलचं प्रमाण दर्शवतो, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं. हे यकृताच्या कार्यक्षमतेलाही बळकटी देतं, जे डिटॉक्स प्रक्रियेचे प्रमुख केंद्र आहे.
मूड सुधारतो, चिंता कमी होते
माचामधील एल-थीनिन केवळ तणाव कमी करत नाही, तर अनिद्रा आणि चिंता (anxiety) देखील नियंत्रित करते. माचातील कॅफिन आणि एल-थीनिनचं संतुलित मिश्रण मूड सुधारतं आणि झोपेची गुणवत्ता खराब होत नाही.
अँटीऑक्सिडंट्सचा पॉवरहाऊस
माचामध्ये असणारं ईजीसीजी (EGCG) हे अँटीऑक्सिडंट सामान्य ग्रीन टीपेक्षा १३७ पट अधिक असतं. हे पेशींची दुरुस्ती करतं आणि वाढत्या वयाच्या प्रक्रियेला धीमा करतं. त्याशिवाय यामध्ये फ्लाव्होनॉईड्स, पॉलीफिनॉल्स आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं.
फिटनेसपासून मेंटल हेल्थपर्यंत माचा एक परिपूर्ण ड्रिंक
सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये, माचा टी एक असा पर्याय ठरतो आहे, जो शरीराला केवळ डिटॉक्स करत नाही, तर मेंटल क्लॅरिटी, एनर्जी आणि मानसिक स्थिरताही प्रदान करतो. म्हणूनच ही पारंपरिक जपानी टी आता आधुनिक आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग बनली आहे.





