Marathi News

Diwali Faral Recipe: १ किलो चकलीची भाजणी कशी बनवायची? पाहा अगदी पारंपरिक रेसिपी

Published:
फराळ बनवताना भाजणी अगदी अचूक बनली तर कुरकुरीत खमंग चकली बनवणे सोपे जाते.
Diwali Faral Recipe: १ किलो चकलीची भाजणी कशी बनवायची? पाहा अगदी पारंपरिक रेसिपी

Chakli Bhajani Recipe:   दिवाळीच्या सणाला फराळाचं विशेष महत्व आहे. आता घराघरात महिलांमध्ये फराळ बनवण्याची घाई दिसून येत आहे. फराळामध्ये लाडूपासून ते चिवड्यापर्यंत अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये अनेकांना आवडते ती खमंग चकली. चकलीची थोडी तिखट थोडी चटपटीत चव सर्वांनाच आवडते.

परंतु पारंपरिक पद्धतीने भाजणीची चकली बनवणे अनेकांना कठीण वाटते. काही महिलांना उत्तम प्रकारे चकली बनवता येते. तर काहींना भाजणी बनवता येत नसल्याने चकलीसुद्धा बिघडते. भाजणी अगदी अचूक बनली तर कुरकुरीत खमंग चकली बनवणे सोपे जाते. भाजणी करताना गडबड झाली तर चकल्यासुद्धा कडक होतात. किंवा बनवताना आणि तळताना त्या तेलातच फुटतात. त्यामुळेच आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते जाणून घेऊया….

 

चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

तांदूळ- १ किलो, जुना आणि जाड तांदूळ

चणे- २५० ग्रॅम

मूग डाळ – १०० ग्रॅम

उडीद डाळ- ५० ग्रॅम

पोहे- ५० ग्रॅम

साबुदाणा- ३० ग्रॅम

धणे- २० ग्रॅम

जिरे- १० ग्रॅम

काळी मिरी- १ चमचा

बडीशेप- २ चमचे

 

चकलीच्या भाजणीची रेसिपी-

 

चकलीची भाजणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक जाड तळाची कढई घ्या.

या कढईमध्ये आपण घेतलेले सर्व पदार्थ एकत्र करून चांगले खमंग भाजून घ्या.

सगळे पदार्थ भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्या.

आता हे पदार्थ थंड झाल्यानंतर ते गिरणीत किंवा घरी त्याचे चांगले पीठ दळून घ्या.

अशाप्रकारे तुमची १ किलो चकलीची खमंग भाजणी तयार आहे.

 

 

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews