नखे खाण्यामुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, जाणून घ्या

Published:
इतर सवयींप्रमाणे नखे खाण्याची सवयही सहजतेने लागते. ते सोडणे कठीण होते आणि त्यामुळे आरोग्य हळूहळू खराब होऊ लागते.
नखे खाण्यामुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, जाणून घ्या

Nail bite side effects In Marathi:   अनेकांना छोट्या-मोठ्या वाईट सवयी असतात. परंतु त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. निरोगी शरीरासाठी विविध निरोगी सवयी अंगीकारल्या पाहिजेत. परंतु त्यासोबतच, वाईट सवयी सोडणे देखील आवश्यक आहे. या वाईट सवयींपैकी एक म्हणजे नखे खाणे होय.काही लोक नेहमीच दातांनी नखे चावत किंवा खात राहतात. ही सवय केवळ अस्वच्छ नाही, तर ती दीर्घकाळ थांबवली नाही तर ती तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते.

अनेकांना ही सवय लहानपणापासूनच लागते, तर काही लोक अत्यंत ताणतणाव किंवा चिंतेमध्ये असताना नखे चावायला लागतात. इतर सवयींप्रमाणे ही सवयही सहजतेने लागते. ते सोडणे कठीण होते आणि त्यामुळे आरोग्य हळूहळू खराब होऊ लागते. नखे चावल्याने तुमच्या आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो ते आपण जाणून घेऊया…

नखे खाण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम-

हिरड्यांच्या समस्या-
वारंवार नखे चावण्याच्या सवयीमुळे, नखे तोंडात अडकू शकतात. अशा परिस्थितीत हिरड्यांमधून रक्त येऊ लागते. काही लोकांना हिरड्या आणि दात किडण्याचा त्रास होतो. ज्यामुळे दातांना संसर्ग आणि जखमा होऊ शकतात.

अपंगत्वाची शक्यता-
तोंडात नखे घालणाऱ्यांच्या शरीरात पॅरोनिचियासारखे अनेक जीवाणू प्रवेश करू शकतात. यामुळे तुमचे शरीर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशा परिस्थितीत हात आणि पायांच्या सांध्यावर परिणाम होऊ शकतो. या समस्येला सेप्टिक आर्थरायटिस असेही म्हणतात. त्यावर उपचार करणे कठीण असू शकते. यामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते.

नखांच्या ऊतींना नुकसान होऊ शकते-
नखे चावल्याने किंवा खाल्याने नखाखालील ऊतींना नुकसान होऊ शकते. काही लोकांना वारंवार नखे चावण्याची सवय असते. ज्यामुळे तुमच्या नखांना कायमचे नुकसान होऊ शकते.

 

नखे खाण्याने दातांना नुकसान होऊ शकते-

नखे चावल्यानेही दातांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वारंवार नखे चावल्याने तुमचे दात तुटू शकतात. तसेच, काही लोकांच्या दातांमध्ये भेगा पडू शकतात. तसेच, घाणीमुळे दातांवर चिवट डाग जमा होऊ शकतात. काही लोकांमध्ये ही समस्या इतकी गंभीर होते की त्यांचे दात तुटू लागतात किंवा पडू लागतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews