Marathi News

मुलांची नजर कमजोर झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे, पालकांनी वेळीच ओळखा

Published:
लहान वयातच डोळ्यांच्या समस्यां दूर करणेदेखील सहज शक्य होते. त्यामुळे पालकांनी ही लक्षणे ओळखायला हवीत.
मुलांची नजर कमजोर झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे, पालकांनी वेळीच ओळखा

How to identify if a child’s eyesight is weak:   डोळे हा शरीराचा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा अवयव आहे. अलीकडे मुलांना डोळ्यांच्या अनेक समस्या येतात. मुले अनेकदा त्यांच्या समस्या व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून पालकांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. काही मुलांची दृष्टी कमकुवत असू शकते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे स्पष्टपणे दिसत नाही.

लहान वयातच मुलांच्या समस्या ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान वयातच समस्यांमधून बरे होणे देखील सहज शक्य होते. त्यामुळेच आज आपण मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांची लक्षणे कशी ओळखायची ते जाणून घेऊया…..

सतत डोळे चोळणे-
लहान मुलं थकल्यावर किंवा झोपेत असताना डोळे मिचकावतात. परंतु जर एखादे मूल दिवसा उजेडातही सतत डोळे चोळत किंवा मिचकावत असेल तर ते डोळ्यांच्या समस्येचे लक्षण असू शकते. तसेच मुलं जर तिरळी पाहात असतील तर हेसुद्धा डोळे खराब होण्याचे लक्षण आहे.

डोळ्यांच्या हालचाली मंद होणे-
मुलांमध्ये डोळ्यांच्या सामान्य हालचाली वेगाने होत असतात. पण, जेव्हा मूल एखाद्या वस्तूला हळू प्रतिक्रिया देते तेव्हा त्याच्या डोळ्यात समस्या असू शकतात. यामध्ये नायस्टॅग्मस किंवा स्ट्रॅबिस्मस यांचा समावेश असू शकतो.

अभ्यासात त्रास होणे-
मुले शाळेत प्रवेश करताच त्यांना पुस्तके वाचायला दिली जातात. या मुलांना वाचण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, त्यांना न फटकारता त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

फोटोफोबिया-
लहान मुलांमध्ये प्रकाशाची काही प्रमाणात संवेदनशीलता असणे सामान्य आहे. परंतु डोळे मिचकावणे किंवा तेजस्वी प्रकाश टाळणे हे प्रकाशाची वाढलेली संवेदनशीलता दर्शवू शकते. ज्याला फोटोफोबिया म्हणतात. फोटोफोबिया हे डोळ्यांच्या विविध आजारांचे लक्षण असू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews