Marathi News

सुपारी अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या सुपारी खाण्याचे फायदे

Published:
सुपारी खाणे चांगले नाही असे बहुतेकांना वाटते. पण तसं नसून या सुपारीचे अनेक फायदे शरीराला होऊ शकतात. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या आजारांपासून सुपारीमुळे आराम मिळतो.
सुपारी अनेक आजारांवर गुणकारी! जाणून घ्या सुपारी खाण्याचे फायदे

सुपारी खाणे चांगले नाही असे बहुतेकांना वाटते. पण तसं नसून या सुपारीचे अनेक फायदे शरीराला होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, सुपारीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे विविध आजारांमध्ये आराम देण्यासाठी प्रभावी आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. सुपारीचे फायदे जाणून घेऊया…

दातदुखी

तोंडातील वेदना कमी करण्यासाठी आणि दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सुपारीचे सेवन करणे फायद्याचे ठरते.  यात असणारे अनेक घटक वेदनाशामक म्हणून काम करतात. ज्यांना दातदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुपारीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

तोंड येणे

तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर आणि त्यामुळे सतत तोंड येत असेल तर सुपारीचे सेवन करा. तोंड आलेले असल्यास तोंडात सुपारी ठेवल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.

उलट्या

सुपारीचे सेवन उलट्या थांबवण्याकरता खूप प्रभावी आहे. सुपारी, हळद आणि गूळ एकत्र करून सेवन केल्यास उलट्या कमी होऊ शकतात. सुपारी उलट्या आणि मळमळ कमी करण्यास मदत करते. 

पचन सुधारते

सुपारी पचनास मदत करते, त्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठता कमी होते. सुपारी पचन सुधारण्यास मदत करते, असे मानले जाते. त्यात काही गुणधर्म आहेत जे पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर करतात. सुपारीमधील काही घटक पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवतात, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते. 

मूळव्याध

मूळव्याध मध्ये सुपारीचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. सोबतच यामुळे पचन देखील चांगले होते. मूळव्याध असल्यास दिवसातून दोनवेळ सुपारीचे पाणी पिणे उपयुक्त ठरते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews