लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेची कँडी

Published:
चवीला आंबटगोड असलेली चिंच खायला सगळ्यांचं खूप आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिंचेची कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड चिंचेची कँडी

बालपणी शाळेबाहेर मिळणारी गोड आणि आंबट चिंचेची कँडी अजूनही त्याच चवीने आठवते. पण आता तीच कँडी बाजारात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम रंग आणि फ्लेवर्ससह उपलब्ध आहे, जी चव देते पण आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आंबटगोड चिंचेची कँडी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

  • चिंच – 1 वाटी
  • गूळ – 1 वाटी (आवडीनुसार कमी-जास्त)
  • साखर – 1/2 वाटी (आवडीनुसार कमी-जास्त)
  • जिरेपूड – 1 चमचा
  • लाल तिखट – 1/2 चमचा (आवडीनुसार कमी-जास्त)
  • मीठ – चवीनुसार
  • वेलची पूड
  • गरम पाणी – चिंच भिजवण्यासाठी 

कृती

  • चिंचेला गरम पाण्यात 15-20 मिनिटे भिजवून घ्या.
  • चिंच आणि पाणी मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • गाळणीने वाटलेली चिंच गाळून घ्या.
  • एका पॅनमध्ये चिंचेचा कोळ, गूळ, साखर आणि मीठ घालून मध्यम आचेवर गरम करा.
  • मिश्रणाला सतत ढवळत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात लाल तिखट, जिरेपूड, काळं मीठ आणि वेलची पूड टाका.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिश्रण कढईला चिटकत नसल्यास आणि गोळा तयार होत असल्यास, गॅस बंद करा.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लहान लहान गोळे किंवा वड्या तयार करा.
  • तयार गोळ्यांना साखरेमध्ये घोळवून घ्या.
  • आता तुमची आंबट-गोड चिंचेची कँडी तयार आहे. 

चिंचेची कँडी खाण्याचे फायदे

चिंचेमध्ये फायबर भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. चिंच व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. चिंच भूक कमी करण्यास आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चिंचेमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. चिंच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews