Marathi News

मुलतानी माती केवळ चेहर्‍यासाठी नाही तर केसांसाठी आहे वरदान, असा करा वापर

Published:
उन्हाळ्यात चिकट आणि तेलकट केसांमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात. मुलतानी माती ही तुमच्या केसांसाठी एक उत्तम उपाय आहे.
मुलतानी माती केवळ चेहर्‍यासाठी नाही तर केसांसाठी आहे वरदान, असा करा वापर

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. केसांची आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलतानी माती ही तुमच्या केसांसाठी एक उत्तम उपाय आहे. ती केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करते आणि कोंडा, केसगळतीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. मुलतानी माती उन्हाळ्यात तुमच्या त्वचेसाठीच फायदेशीर नसते तर केसांवरही त्याचा आश्चर्यकारक परिणाम होतो. ते कसे वापरायचे चला जाणून घेऊया.

मुलतानी माती आणि लिंबाचा रस

मुलतानी माती आणि लिंबाचा रस हे दोन्ही केसांसाठी खूप फायद्याचे आहेत. मुलतानी माती केसांची स्वच्छता करते, कोंडा दूर करते आणि केसांना चमक देते. लिंबाचा रस तेलकटपणा कमी करतो. लिंबू अँटी-फंगल आहे, ज्यामुळे कोंडा दूर होतो. एका भांड्यात मुलतानी माती घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. या पेस्टला टाळूवर आणि केसांवर 20-25 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. 

मुलतानी माती आणि दही

मुलतानी माती आणि दही हे दोन्ही केसांसाठी खूप फायद्याचे आहेत. मुलतानी माती केसातील अतिरिक्त तेल शोषून घेते, त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. दही हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात, तसेच केस मजबूत होण्यास मदत होते. दही आणि मुलतानी माती हे दोन्ही केसांची मुळे मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते. 2 चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे दही मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांवर आणि टाळूवर चांगले लावा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावून 20-30 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा मास्क आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास चांगले परिणाम दिसतात. 

मुलतानी माती आणि नारळ तेल

केसांसाठी मुलतानी माती आणि नारळ तेल हे एक उत्तम मिश्रण आहे, जे केसांसाठी अनेक फायदे देते. मुलतानी माती केसांतील तेल आणि घाण साफ करते, तर नारळ तेल त्यांना मॉइस्चराइझ करते. दोन चमचे मुलतानी माती पावडर आणि एक चमचा नारळ तेल एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी, दही किंवा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. मिश्रण टाळूवर आणि केसांवर व्यवस्थित लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मुलतानी माती आणि नारळ तेल या दोन नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही एक उत्कृष्ट हेअर मास्क तयार करू शकता. हे मिश्रण तुमच्या केसांसाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews