Marathi News

कोंडा आणि केस गळती कमी करण्यासाठी लसणाचे ‘ हे ’ हेअर पॅक वापरा!

Published:
वाढते प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपले केस चमकदार आणि निरोगी ठेवणे आपल्यासाठी खूप कठीण होते. अशा परिस्थितीत रासायनिक पद्धतीने बनवलेले शॅम्पू आणि केसांच्या उत्पादनांचा प्रभावही फार काळ टिकत नाही. सुंदर केसांसाठी तुम्ही नैसर्गिक पद्धती वापरून पाहू शकता.
कोंडा आणि केस गळती कमी करण्यासाठी लसणाचे ‘ हे ’ हेअर पॅक वापरा!

तुमचे केस लवकर गळतात का? कोंड्यामुळे तुमच्या टाळूला खाज सुटते आणि जळजळ होते का? या समस्यांचे निराकरण केवळ महागड्या उत्पादनांमध्येच नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातही आहे. लसूण केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर केसांचे आरोग्य देखील सुधारते. लसणात असलेले अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देतात आणि टाळू खोलवर स्वच्छ करतात. आपण केसांसाठी लसूण कसा वापरू शकतो ते जाणून घेऊयात…

लसूण आणि खोबरेल तेल

कोंडा आणि केस गळतीसाठी तुम्ही लसूण आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क वापरू शकता. लसूणमध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे कोंडा कमी करण्यास मदत करतात, तर खोबरेल तेल केसांसाठी पोषक आहे. लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक करा. एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा आणि त्यात लसूण टाका. मंद आचेवर ५-१० मिनिटे गरम करा.  मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्या. तयार तेलाने टाळूवर आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा.  २-३ तास तसेच ठेवा, नंतर केस शॅम्पूने धुवा.  आठवड्यातून २-३ वेळा हा मास्क वापरा. 

लसूण आणि कोरफड

 कोंडा आणि केस गळतीसाठी लसूण आणि कोरफड यांचा हेअर मास्क वापरणे फायदेशीर ठरू शकते. लसणामध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे कोंडा कमी होतो. तसेच, कोरफड केसांसाठी मॉइश्चरायझर आणि पोषण देण्याचे काम करते. लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात कोरफड जेल आणि तेल मिक्स करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना आणि टाळूला चांगली लावा. 30-40 मिनिटे तसेच ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. 

लसूण आणि मध

कोंडा आणि केस गळणे यावर लसूण आणि मध यांचा हेअर मास्क खूप प्रभावी आहे. लसूणमध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म कोंड्यासाठी कारणीभूत असलेल्या बुरशीला मारतात, तर मध केसांसाठी मॉइश्चरायझरचे काम करते. लसूण बारीक वाटून घ्या. लसणाच्या पेस्टमध्ये मध मिसळून घ्या. हे मिश्रण केसांना आणि टाळूला चांगले लावा. 15-20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस धुवा. कोंडा आणि केस गळती कमी होईपर्यंत, आठवड्यातून 1-2 वेळा हा उपाय करा. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews