दुपारच्या चहासोबत खायला बनवा मसाला ब्रेड, १५ मिनिटांत बनणारी रेसिपी

Published:
बहुतेक घरांमध्ये, ब्रेड नाश्त्यात खाल्ली जाते. ब्रेडपासून तुम्ही अनेक पदार्थ आणि पाककृती बनवू शकता. ब्रेड नाश्त्यात खाऊ शकता आणि संध्याकाळच्या चहासाठीही त्यापासून अनेक स्नॅक्स बनवता येतात.
दुपारच्या चहासोबत खायला बनवा मसाला ब्रेड, १५ मिनिटांत बनणारी रेसिपी

Bread Masala Recipe:  घरात ब्रेडचे शेवटचे १-२ स्लाईस उरले असतील आणि तुम्ही त्यातून काहीतरी नवीन बनवू शकत नसाल, तर ब्रेड मसाला ट्राय करून पहा. ही रेसिपी तयार होण्यास फक्त १० मिनिटे लागतील. आणि तुमची संध्याकाळची भूकसुद्धा पूर्ण करू शकेल. घरी उपलब्ध असलेल्या काही साहित्यामध्येच ही डिश  कशी  बनवायची सह जाणून घेऊया सोपी  रेसिपी…

साहित्य-

२ स्लाईस ब्रेड
२ टीस्पून बटर
२ पाकळ्या लसूण बारीक चिरून
१ हिरवी मिरची
१/२ कांदा बारीक चिरून
१/२ गाजर बारीक चिरून
१ टीस्पून सिमला मिरची
१ टीस्पून हिरवा कांदा बारीक चिरून
२ टोमॅटो
१ टीस्पून पावभाजी मसाला
चवीनुसार मीठ
टोमॅटो सॉस

ब्रेड मसाला रेसिपी –

-एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यात लसूण, हिरवी मिरची, हिरवी पात आणि कांदा परतून घ्या.

-आता सर्व भाज्या घाला आणि थोडा वेळ ढवळून घ्या. २-३ मिनिटे शिजल्यानंतर मीठ घाला आणि चांगले मिक्स करा.

-यानंतर पावभाजी मसाला आणि टोमॅटो सॉस घाला आणि थोडा वेळ ढवळून घ्या. शेवटी ब्रेडचे तुकडे घाला आणि सर्व साहित्य मिसळेपर्यंत ३-४ मिनिटे शिजवा.

-तुमचा ब्रेड मसाला तयार आहे. हिरवी कोथिंबीर घाला आणि गरम चहासोबत त्याचा आस्वाद घ्या.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews