Marathi News

प्रेग्नेंसीमध्ये मानसिक आरोग्य कसे जपावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

Published:
प्रेग्नेंसीदरम्यान शारीरिक आरोग्य कसे राखायचे यावर लक्ष केंद्रित करतो, परंतु मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
प्रेग्नेंसीमध्ये मानसिक आरोग्य कसे जपावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

How to maintain mental health during pregnancy:   आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी एक अतिशय भावनात्मक क्षण असतात. याकाळात महिलांना अनेक बदलांचा सामना करावा लागतो. गर्भधारणेमुळे महिलांचे हार्मोन्स बदलतात, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येकजण अनेकदा गर्भधारणेदरम्यान त्यांचे आरोग्य कसे राखायचे यावर लक्ष केंद्रित करतो, परंतु या काळात भावनांमध्ये होणाऱ्या बदलांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या भावनामध्ये वारंवार चढ-उतार होतात. ज्यामुळे त्या कधीकधी रडतात आणि कधीकधी छोट्या-छोट्या गाष्टींमध्येदेखील आनंदी होतात. परंतु, या काळात, महिलांनी त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण गर्भधारणेदरम्यान मानसिक आरोग्य राखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया…..

मनमोकळेपणाने संवाद साधा-
गरोदरपणात महिलांच्या मनःस्थितीत प्रचंड बदल जाणवतात. त्यांच्या भावना लपवण्याऐवजी, महिलांनी त्यांच्या जोडीदाराशी, मित्रांशी किंवा कुटुंबाशी मोकळेपणाने संवाद साधावा. यामुळे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास आणि बरे वाटण्यास मदत होऊ शकते.

स्वतःची काळजी घ्या –
अशा परिस्थितीत, तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गर्भधारणेदरम्यान, तुम्हाला बरे वाटणाऱ्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. ताणतणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ध्यान आणि व्यायाम करा. सकारात्मक राहा.

निरोगी जीवनशैली –
खराब जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. म्हणून, गर्भधारणेदरम्यान तुमच्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्या. तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करण्यासाठी आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्या.

सपोर्ट सिस्टम बनवा –
गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेकदा एकटेपणा जाणवतो, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून, अशा लोकांभोवती जास्त वेळ घालवा जे तुम्हाला समजून घेतात.

महत्वाची माहिती ठेवा –
गर्भधारणेदरम्यान या बदलांसाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करावे लागेल. गर्भधारणेदरम्यान भावनिक बदल कधी आणि कसे होतात ते जाणून घ्या. या काळात कसे वाटते, ताण, चिंता आणि नैराश्याची लक्षणे कोणती आहेत. गर्भधारणेदरम्यान या सर्व गोष्टींबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही येणाऱ्या बदलांसाठी तयार राहू शकाल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews