Mental health in Marathi: आजकल मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या तरुण वर्गामध्ये जास्त बघायला मिळत आहे. सहसा याचे कारण आपली बदलेली जीवनशैली आहे. स्पर्धात्मक जग, नोकरी, शालेय जीवन, आर्थिक समस्या, आरोग्याच्या व्याधि, नाते संबंध या सर्वांचे परिणाम आपल्या मानसिक तणावाचे कारण बनते.याकडे दुर्लक्ष केल्यास याचे रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होवू शकते.
दैनंदिन चिंता, कामाचा दबाव, कौटुंबिक समस्या, भीतीमुळे मनावर येणारा ताण म्हणजे मानसिक तणाव होय. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सोपे व परिणामकारक उपाय आपण जाणून घेऊया….
ध्यान करा –
आताच्या पिढीमध्ये एकग्रतेची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. आताची मुले कोणत्याही गोष्टीत खूप वेळ आपले मन एकाग्र ठेवू शकत नाहीत. हेच मानसिक तणावाचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी रोज सकाळी १५ ते २० मिनटे ध्यान करावे. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्यास मन शांत राहते आणि मानसिक तणाव कमी होतो. नियमितपणे अनुलोम-विलोम व भ्रामरी प्राणायाम केल्याने मेंदूला शांतता मिळते, एकाग्रता वाढते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.
पुरेशी झोप-
झोपेच्या अभावाने अनेक आजार डोकं वर काढतात. यातीलच एक आहे मानसिक तणाव. रात्री उशिरापर्यंत जागणे, मोबाईलवर रील स्क्रोल करणे, टीव्ही बघणे, किंवा उशिरापर्यंत काम करणे हे सर्व मेंदूवर परिणाम करते व मानसिक तणाव वाढवते. हे कमी करण्यासाठी रोज ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी १ तास आधी स्क्रिन पाहणे बंद करा. रात्री किमान १० वाजता झोपी जावा. कारण पुरेशी झोप घेतल्यास मन प्रसन्न राहते आणि कामातील एकाग्रता वाढते.
संतुलित आहार गरजेचे-
आपल्या जीवनशैलीतील मुख्य बदल आहे आपले आहार, हल्ली फास्टफूडचा जमाना आहे. परंतु या फास्टफूड, जंकफूड मुळे लट्टपणा, मधुमेह, स्किन प्रॉब्लेम यासोबतच मोठ्या प्रमाणत मानसिक तणावाची समस्या वाढली आहे. यात मेंदूला आवश्यक पोषण मिळत नाही आणि मानसिक थकवा जाणवतो. याचा झोपेवर परिणाम होतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. रोजच्या आहारात फळे, भाजीपाला आणि कडधान्यांचा समावेश केल्यास शरीर व मन दोन्ही निरोगी राहतात.
भावना व्यक्त करा –
भावना व्यक्त न करणे हे मानसिक तणावाचे सर्वात महत्वाचे कारण आहे. आपण आपल्या भावना जेव्हा दाबून ठेवतो तेव्हा त्या मानसिक समस्येच्या रूपातून बाहेर येतात. आपल्याला कोणी जज करतील, आपल्यावर हासतील, नाहीतर आपल्या काय तर म्हणतील याचा विचार करून आपण आपल्या समस्या आपल्या भावना अनेकदा व्यक्तच करत नाही. आणि याच भावना मानसिक तणाव बनतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






