Marathi News

कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, फक्त ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Published:
हिट आणि स्टाइलिंग साधनांचा केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस कोरडे होतातच, शिवाय तुटणे आणि गळणे देखील सुरू होते.
कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, फक्त ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Home remedies to straighten curly hair:   काहींना कुरळे केस आवडतात तर काहींना स्ट्रेट केस आवडतात. प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार हेअरस्टाईल स्वीकारतो. कुरळे केस सरळ करणे कठीण वाटते. तरीही, आपण आपले कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी ब्युटी सलून किंवा पार्लरमध्ये जातो.

परंतु त्या हिट आणि स्टाइलिंग साधनांचा केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस कोरडे होतातच, शिवाय तुटणे आणि गळणे देखील सुरू होते. मग आपण घरी कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी DIY हॅक्स का वापरून पाहू नये. यामुळे केस सरळ होतीलच, पण नैसर्गिक घटकांचा वापर करून ते मजबूत आणि चमकदार देखील होतील.

 

अंडी-

जर अंडी ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून केसांना लावली तर केसांना पूर्ण पोषण मिळतेच पण केसांचा कुरळेपणाही निघून जातात.

कसे वापरावे?
२ अंड्यांमध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा.
हे मिश्रण चांगले फेटून घ्या. जेव्हा ते फेस येऊ लागते तेव्हा ते चांगले मिसळले आहे असे समजा.
हे मिश्रण तुमच्या केसांना लावा.
ते केसांवर दीड तास राहू द्या.
यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा.
आठवड्यातून एकदा ते लावल्याने केस स्ट्रेट होतात.

 

एरंडेल तेल आणि खोबरेल तेलाचे मिश्रण-

एरंडेल तेल आणि खोबरेल तेल दोन्ही केसांना मुळांपासून मजबूत करतात. यामुळे केस सरळ होतात. तसेच केस चमकदार आणि रेशमी होतात.

कसे वापरावे?
एक चमचा एरंडेल तेल आणि १ चमचा खोबरेल तेल घ्या.
दोन्ही तेल एकत्र करा.
दोन्हीही मंद आचेवर हलके गरम करा.
हे मिश्रण केसांना आणि टाळूला चांगले लावा.
सुमारे १५ मिनिटे टाळूला मालिश करा.
३०-४० मिनिटे तसेच राहू द्या.
हर्बल शॅम्पूने केस धुवा.
आठवड्यातून दोनदा असे केल्यास तुमचे केस स्ट्रेट होऊ शकतात.

 

 

कोरफडीचे जेल-

जर कोरफडीचे जेल खोबरेल तेलात मिसळले तर केस चांगले हायड्रेट होतात आणि केस स्ट्रेट होण्यास मदत होते.

कसे वापरावे?
१ कप कोरफडीचे जेल १ कप खोबरेल तेलात पूर्णपणे मिसळा.
कोरफडीचे जेल मिसळण्यापूर्वी, मंद आचेवर तेल गरम केल्याने चांगले परिणाम मिळतात.
हे मिश्रण केसांना आणि टाळूला पूर्णपणे लावा.
ते सुमारे ४० मिनिटे केसांवर राहू द्या.
थंड पाणी आणि शॅम्पूने केस स्वच्छ करा.
आठवड्यातून एकदा हे वापरून पाहता येते.

 

लिंबाचा रस-

लिंबाचा रस केस स्ट्रेट करण्यास मदत करतो. नारळाच्या दुधात मिसळून लावल्याने केसांना चांगले कंडिशनर मिळते. यामुळे केसांना व्हिटॅमिन सीचे पोषण मिळते, ज्यामुळे केस मऊ होतात.

कसे वापरावे?
एक चहाचा कप नारळाचे दूध आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस घ्या.
दोन्ही एका भांड्यात चांगले मिसळा आणि झाकून ठेवा.
शक्य असल्यास, हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा.
७-८ तासांनंतर, हे मिश्रण केसांच्या मुळांवर आणि टाळूवर लावा.
सुमारे ३० मिनिटे तसेच राहू द्या.
नंतर, हर्बल शाम्पूने केस पूर्णपणे स्वच्छ करा.
आठवड्यातून एकदा ते वापरल्याने केस सरळ होऊ शकतात.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews