ओरल हेल्थसाठी फक्त ब्रश करणे पुरेसे नाही, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या

Published:
दररोज ब्रशिंग आणि फ्लॉसिंग केल्याने तुमचे दात नक्कीच निरोगी राहतात. परंतु तोंडाचे आरोग्य फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही.
ओरल हेल्थसाठी फक्त ब्रश करणे पुरेसे नाही, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या

Oral health tips in Marathi:   तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे हे शरीरासाठी फारच फायदेशीर आहे. निरोगी स्माईल मुळे केवळ आत्मविश्वास निर्माण होत नाही, तर अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो. तुम्ही खाण्यासाठी, हसण्यासाठी, बोलण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी तुमच्या तोंडाचा वापर करता.परंतु तुमच्या तोंडाचे आरोग्य या सर्वांवर परिणाम करू शकते.

दररोज ब्रशिंग आणि फ्लॉसिंग केल्याने तुमचे दात नक्कीच निरोगी राहतात. परंतु तोंडाचे आरोग्य फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. तुम्ही इतर काही छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष दिले पाहिजे. तर, आज आपण या गोष्टींबद्दल जाणून घेऊया…..

दातांची तपासणी करणे-
लोक बहुतेकदा तोंडाच्या आरोग्याच्या समस्या असल्यासच डेंटिस्टकडे जातात. परंतु, वर्षातून किमान दोनदा तपासणीसाठी डेंटिस्टकडे जाणे महत्वाचे आहे. यामुळे डॉक्टरांना सुरुवातीच्या टप्प्यातच दात किडणे आणि हिरड्यांचे आजार ओळखता येतात आणि त्यांचे निदान करता येते. नियमित तपासणीमुळे तुमचे तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत होईलच, शिवाय गंभीर आजारांपासूनही तुमचे रक्षण होईल.

फ्लॉस-
दिवसातून किमान एकदा इंटर-प्रॉक्सिमल टूथब्रश किंवा फ्लॉस वापरा. कारण अन्न आणि बॅक्टेरिया प्रथम दातांमध्ये जमा होतात. फ्लॉस न केल्यास हिरड्यांना सूज येऊ शकते आणि इंटर-प्रॉक्सिमल डेक्स होऊ शकतो. नियमित फ्लॉस केल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येते.

जिभेची स्वच्छता-
मौखिक आरोग्याच्या बाबतीत, तुमची जीभ तुमच्या दातांइतकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच, तुमच्या दातांप्रमाणेच, तुमची जीभही स्वच्छ करणे आवश्यक आहे. तुमची जीभ स्वच्छ केल्याने केवळ तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया दूर राहण्यास मदत होत नाही, तर तोंडाची दुर्गंधी देखील दूर होण्यास मदत होते.

ब्रशिंग टेक्निक-
तुमच्या ब्रशिंग टेक्निकचा तुमच्या तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. ब्रश करताना, थोड्या प्रमाणात टूथपेस्ट वापरा. तुमचे दात ड्राय क्लीनिंग करणे अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. कमी टूथपेस्ट वापरूनही, तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews