Relationship Coach : Happy Couple मध्ये असतात या ७ सवयी, तुम्हीही करा चेक

Written by:Smita Gangurde
Published:
कोणतंही नातं कायम चांगलं ठेवणं सोपं नसतं. मात्र जर काही लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलं तर नातं अधिक दृढ होतं.
Relationship Coach : Happy Couple मध्ये असतात या ७ सवयी, तुम्हीही करा चेक

कोणतंही नातं कायम चांगलं ठेवणं सोपं नसतं. मात्र जर काही लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलं तर नातं अधिक दृढ होतं. प्रसिद्ध रिलेशनशिप कोच आणि लेखक जवान भट्ट यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आनंदी जोडप्याच्या काही खास अशा सात गोष्टी सांगितल्या आहेत. या सवयी कोणतंही नातं अधिक सुंदर बनवतात.

आनंदी जोडप्याच्या सात सवयी…

तक्रारी कमी करणे
जवाल भट्ट यांनी सांगितलं, आनंदी जोडपे अधिकतर एकमेकांसोबत आनंदी असतात. ते लहान-लहान गोष्टींवर तक्रार करण्याऐवजी एकमेकांसोबत आनंद शोधतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात.

एकमेकांचं ऐकणं

काही वेळेस जोडप्याला एकमेकांच्या म्हणण्यात फार आवड नसते. मात्र तरीही आनंदी जोडपं एकमेकांचं ऐकतात. हा समजूतदारपणा आहे.

एकमेकांच्या छंदात आवड दाखवणं

दुसऱ्या जोडीदाराचा छंद तुम्हाला आवडत नसता, तरीही त्यामध्ये थोड इंटरेस्ट दाखवावा. यामुळे नात्यातील दोर अधिक दृढ होते.

पूर्णपणे अवलंबून राहू नये

आनंदी जोडपं एकमेकांसोबत नसतील तर त्यांना कमतरता वाटते. मात्र त्यांचं संपूर्ण आयुष्य केवळ पार्टनरवर अवलंबून नसते. ते एकमेकांना स्पेस देतात.

सायलेन्स एन्जॉय करणं

प्रत्येक वेळी बोलणं आवश्यक नसते. कधी कधी एकमेकांसोबत शांत बसणं चांगलं असतं. आनंदी जोडपं एकमेकासोबत शांतताही एन्जॉय करतातय

सर्व गोष्टी शेअर करणं

आनंदी जोडपं एकमेकांसोबत काहीही शेअर करायला घाबरत नाही. आनंदी जोडपं जजमेंटच्या भीतीने गोष्टी लपवून ठेवत नाही आणि सर्व शेअर करतात.

आनंदाच्या क्षणी सर्वात आधी पार्टनर आठवतो

यापेक्षाही वेळचं म्हणजे आनंदी जोडपं प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपल्या पार्टनरची आठवत करतात.

या ७ सवयी दाखवतात की, आनंदी नात्यात प्रेमासोबतच आदर, समजूतदारपणा आणि मैत्री देखील महत्त्वाची असते. जर तुम्ही तुमच्या नात्यात या सवयींचा अवलंब केला तर तुमचे नाते आणखी मजबूत आणि सुंदर बनू शकते.

 

Follow Us :GoogleNews