मुंबई- तुम्हीही दररोज आंघोळ करताना साबण लावता, जर हो असेल तर जरा थांबा. बहुतांश लोकांना असं वाटतं की आंघोळ करताना त्वचेवर साबण लावल्याने शरीर स्वच्छ होतं. मात्र ही सवय तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का? खरं तर दररोज अंगाला साबण लावल्याने त्वचेवरील मॉइश्चर कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात किती वेळेस साबणाचा वापर करणं योग्य आहे, याबाबत जाणून घ्यायला हवं. या लेखात आपण जाणून घेणार आहोत कधी आणि किती वेळा साबणाचा वापर करणं योग्य आहे.
दररोज साबण का लावू नये?
दररोज अंगाला साबण लावणं योग्य नसतं. शरीर स्वच्छ ठेवणं आवश्यक असतं. मात्र दररोज त्वचेवर साबण लावल्याने तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ लागला. म्हणजे तुम्ही दररोज साबणाचा वापर केला तर त्वचा कोरडी आणि निर्जिव दिसू लागते. जर तुम्हाला दररोज साबणाचा वापर करायचा असेल तर तु्म्ही केमिकल बेस्ड साबणाऐवजी नॅच्युरल साबणाचा वापर करू शकता.
किती दिवस साबण लावणं योग्य?
जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही दररोज साबण वापरू नका. आठवड्यातील तीन ते चार दिवस साबण वापरू शकता. तसं पाहता एका आठवड्यात किती वेळा साबण वापरावं याबाबत तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत.
या गोष्टी लक्षात ठेवा…
जर तुम्ही आठवड्यातील दोन ते तीन दिवस साबणाचा वापर करीत असाल तर यामुळे त्वचा रुक्ष होणार नाही. सोबतच ज्या दिवशी साबणाचा वापर करीत असाल त्या दिवशी थंड पाण्याने अंघोळ करायला हवी. गरम पाण्यामुळे त्वचेवरील सॉफ्टनेस कमी होऊ शकते. हवं असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. यामुळे कोरडेपणाची समस्या कमी होईल. मात्र ज्या दिवशी साबण वापरणार नसाल त्या दिवशी आंघोळ स्किप करू नका. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करणं अत्यंत आवश्यक असतं. मग तुम्ही फक्त पाण्याने आंघोळ केली तरी चालेल.





