दररोज करा डोक्याची मालिश, मिळतील ५ आश्चर्यकारक फायदे

Published:
डोक्याची मालिश केल्याने केस आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते.
दररोज करा डोक्याची मालिश, मिळतील ५ आश्चर्यकारक फायदे

Scalp massage benefits in Marathi:  आपण सलून किंवा पार्लरमध्ये हेअर स्पासाठी किंवा केस कापण्यासाठी जातो तेव्हा आपण डोक्याची मालिश नक्कीच करतो. बऱ्याचदा, दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी, लोक पार्लर किंवा सलूनमध्ये जातात आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने डोक्याची मालिश करतात. टाळूची मालिश केल्याने डोकेदुखी, ताण आणि थकवा कमी होण्यास मदत होते.

पण तुम्हाला माहिती आहे का की, टाळूची मालिश केल्याने तुमची डोकेदुखी आणि ताण कमी होण्यास तसेच केस आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते. तुमच्या टाळूवर केलेली मालिश केसांची वाढ होण्यास आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यास देखील मदत करू शकते….

टाळूत रक्ताभिसरण सुधारते-
डोक्याच्या मालिशमुळे तुमच्या टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. ज्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पोहोचतो. टाळूमध्ये योग्य रक्ताभिसरणामुळे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास देखील मदत होते.जे निरोगी केसांसाठी आवश्यक आहे.

केस मजबूत करते-
टाळूच्या मालिशमुळे रक्तप्रवाह वाढून छिद्रांमध्ये पोषक तत्वे पोहोचण्यास मदत होते.ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात. रक्ताभिसरण सुधारल्याने केराटिन उत्पादनात देखील मदत होते.

झोप सुधारण्यास मदत-
टाळूच्या मसाजचा शरीरावर आणि मनावर आरामदायी प्रभाव पडतो. ज्यामुळे ताण कमी होतो आणि चांगली झोप येते. मसाज दरम्यान एंडोर्फिन सोडल्याने आरामाची भावना निर्माण होऊ शकते. ज्यामुळे निद्रानाश देखील कमी होऊ शकतो.

टाळूची स्थिती सुधारते-
टाळूच्या मालिशमुळे टाळूद्वारे तयार होणारे नैसर्गिक तेल वितरित होण्यास मदत होते. जे टाळू आणि केस दोघांनाही कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझेशन देऊ शकते. नियमित मालिशमुळे टाळू एक्सफोलिएट होण्यास मदत होते. मृत त्वचेच्या पेशी आणि अतिरिक्त सेबम काढून टाकता येतो.

मन शांत करते-
टाळूचा मसाज मन शांत करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी फायदेशीर ठरू शकते. या मसाजमुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढते, जे आनंदाचे संप्रेरक आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews