What to eat for a glowing face: हिवाळ्यात चमकदार त्वचा मिळवणे तसे अनेकांना कठीण वाटते. परंतु तुमच्या आहारात ड्रायफ्रूट्स समाविष्ट करा. ड्रायफ्रूट्समध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स त्वचेला आतून पोषण देतात. ज्यामुळे ती निरोगी, मऊ आणि चमकदार बनते. आज आम्ही तुम्हाला अशा ड्रायफ्रूट्सबाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला नैसर्गिकरित्या ग्लोइंग स्किन देण्यास मदत करतात….
मनुके-
मनुक्यासारखे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. आणि पिंपल्स आणि डाग कमी होतात. मनुका हे लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले ड्रायफ्रूट्स आहे. हिवाळ्यात मनुका खाल्ल्याने त्वचा स्वच्छ आणि उजळ होण्यास मदत होते. चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही पाण्यात भिजवलेले १० ते १२ मनुके खाऊ शकता.
बदाम-
बदाम हे फक्त मेंदूसाठीच नाही तर त्वचेच्या ग्लोसाठी देखील एक सुपरफूड आहे. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे त्वचेला यूव्ही किरणांपासून वाचवते आणि निस्तेज आणि कोरडी त्वचा देखील मऊ करते. हिवाळ्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. बदाम डाग आणि सुरकुत्या देखील कमी करतात.
पिस्ता-
हिवाळ्यात पिस्ता त्वचेला हायड्रेट करतो आणि निस्तेज त्वचा ताजीतवानी करतो. हिवाळ्यात दररोज ६ ते ७ पिस्त्याचे तुकडे खाल्ल्याने डाग कमी होण्यास आणि त्वचेला गुलाबी चमक येण्यास मदत होते. महागड्या प्रॉड्क्टसऐवजी पिस्ता खाल्ल्यास चेहरा चमकू लागतो.
अक्रोड –
तुम्हीही चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी काहीतरी शोधत असाल तर अक्रोड हा उत्तम पर्याय आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात दररोज २ ते ३ अक्रोड खाल्ल्याने त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होते, त्वचेची लवचिकता वाढते आणि सुरकुत्या टाळण्यास मदत होते. जर तुम्हाला लहान वयात सुरकुत्या येण्याची काळजी वाटत असेल तर तुमच्या आहारात अक्रोडचा नक्की करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






