Success Story: सायकलवरुन पुरणपोळीची विक्री ते १८ आउटलेट्सचा मालक, वाचा भास्कर यांची थक्क करणारी यशोगाथा

Published:
सध्या चर्चेत असलेले पुरणपोळी घर या आउटलेट्सचे मालक के.आर. भास्कर हे सुरुवातील हॉटेलमध्ये भांडी घासायचे तसेच वेटरचे काम करायचे.
Success Story: सायकलवरुन पुरणपोळीची विक्री ते १८ आउटलेट्सचा मालक, वाचा भास्कर यांची थक्क करणारी यशोगाथा

Puranpoli Ghar owner success story:   जगभरात आणि खासकरून भारतामध्ये असे अनेक लोक आपण पाहतो ज्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे. जिद्द, कष्ट, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक लोक यश मिळवतात. त्यातीलच एक नाव म्हणजे भास्कर पुरणपोळी घर होय. सध्या खाद्यपदार्थांच्या विश्वात हा एक लोकप्रिय ब्रँड बनला आहे. आज देशभरात या ब्रँडची चर्चा होत असली तरी एकेकाळी सायकलवरून त्यांनी व्यवसाय केला आहे. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

हॉटेलमध्ये वेटर ते यशस्वी उद्योजक-

सध्या चर्चेत असलेले पुरणपोळी घर या आउटलेट्सचे मालक के.आर. भास्कर हे सुरुवातील हॉटेलमध्ये भांडी घासायचे तसेच वेटरचे काम करायचे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. लहानपणीच वडील गमावल्याने त्यांची आई धुणे-भांडी घासायची. आईला हातभार लावण्यासाठी भास्कर यांनीसुद्धा काम करायला सुरुवात केली. त्यांनी विविध काम करून आईला हातभार लावला.

कर्नाटकात जन्मलेल्या भास्कर यांनी बंगळुरूमध्ये हॉटेल्समध्ये काम केलं. त्यांनंतर त्यांनी पान विकण्याचा व्यवसाय सुरु केला. नंतर त्यांनी नृत्य शिकवायला सुरुवात केली. यामध्येही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सर्वकाही सोडून आपल्या आईच्या पारंपरिक पुरणपोळीलाच व्यवसाय बनवला. त्यांनी एक सायकलवरून डब्यात आईने केलेल्या पुरणपोळी घेऊन विकायला सुरुवात केली. लोकांना पुरणपोळी खूप आवडल्या.

त्यांचा पुरणपोळीचा व्यवसाय व्यवस्थित सुरु झाला. यादरम्यान काही कुकिंग शोच्या निर्मात्याची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी या कुकिंग शोमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या रेसिपीमध्ये बऱ्याच सुधारणा करून त्यांनी नव्या जोमाने हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी ‘पुरणपोळी घर’ हा स्वतःचा ब्रँड सुरु केला. त्याला इतके यश मिळाले कि आज त्यांचा १७ आउटलेट्स आणि १० हुन अधिक फ्रँचायझी आहेत.

महिन्याची कमाई-

कर्नाटकात आणि मुंबईमध्ये त्यांनी ‘पुरणपोळी घर’च्या विविध आउटलेट्स उघडल्या आहेत. ते महिन्याला तब्बल १८ कोटी कमावतात. ते दर ८ महिन्याला नवीन आउटलेट्स उघडतात. पुरणपोळीसोबतच ते ४०० प्रकारचे स्नॅक्स विकतात. दरम्यान सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक या शोमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews