एक दिवसीय सहलीसाठी बेस्ट आहेत पुण्याजवळील ‘ही’ ठिकाणे, आजच करा प्लॅन

Published:
मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीला अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. पण अनेकवेळा सुट्ट्यांच्या अभावामुळे एक दिवसीय ट्रिप बेस्ट वाटते.
एक दिवसीय सहलीसाठी बेस्ट आहेत पुण्याजवळील ‘ही’ ठिकाणे, आजच करा प्लॅन

Places near Pune for a one day trip:  पुणे हे एक सुंदर ठिकाण आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. पुण्याला शिक्षणाचे माहेरघरदेखील म्हटले जाते. देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात जातात.

पण जर तुम्ही एक दिवसाच्या सहलीसाठी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुण्यातील आणि आसपासच्या या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात पुण्याचे हवामान खूप आल्हाददायक होते. या सुंदर ठिकाणांची खासियत जाणून घेऊया…

 

पवना लेक-

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि शांतता आवडत असेल तर पवन लेकला नक्की भेट द्या. येथे तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा जोडीदारासोबत रात्र देखील घालवू शकता. यासाठी, तुम्हाला पवना तलाव येथे सामान्य दरात टेन्ट मिळेल. तुम्ही एक दिवसाची सहल संस्मरणीय बनवू शकता.

 

पाचगणी-

पाचगणी हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात पाचगणी हिल स्टेशनचे हवामान खूप आल्हाददायक असते. एक दिवसाच्या सहलीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. टेबल लँड, सिडनी आणि पारसी पॉइंट ही पाचगणीतील मुख्य ठिकाणे आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासह आणि मित्रांसह या ठिकाणांना भेट देऊ शकता.

 

लोहगड किल्ला-

पुण्यापासून लोहगड किल्ल्याचे अंतर फक्त ५५ किमी आहे. तुम्ही रस्त्याने लोहगड किल्ल्यावर पोहोचू शकता. त्याची उंची समुद्रसपाटीपासून ३४०० फूट आहे. या किल्ल्याला चार मुख्य दरवाजे आहेत, जे अनुक्रमे नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा आहेत. हा किल्ला १८ व्या शतकात बांधला गेला होता. जर तुम्ही भेट देण्याचा विचार करत असाल तर लोहगड किल्ल्याला नक्की भेट द्या.

 

खंडाळा

‘आती क्या खंडाला’ या हिंदी गाण्यामुळे हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. याआधीही हे ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जात होते. खंडाळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळ्याजवळ आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणांना एकत्र भेट देऊ शकता. खंडाळ्यात अनेक सुंदर धबधबे आहेत. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासह पुण्याभोवती खंडाळा आणि लोणावळा येथे भेट देऊ शकता.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews