Benefits of consuming Triphala: आयुर्वेदात त्रिफळा हे एक खूपच फायदेशीर औषध मानले जाते. त्रिफळा सामान्यतः तीन औषधी वनस्पती एकत्र करून तयार केले जाते. यामध्ये आवळा, हिरडा आणि बहेडा यांचे मिश्रण असते. त्रिफळा हे व्हिटॅमिन सी, पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन, सॅपोनिन्स, गॅलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे यासह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात.
हिवाळ्यात कोणत्याही स्वरूपात त्रिफळा सेवन करणे फायदेशीर मानले जाते. दररोज त्रिफळाचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळेच आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात त्रिफळाचे पाणी पिण्याचे विविध फायदे…..
डायबिटीसमध्ये फायदेशीर-
त्रिफळामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. जे रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. आवळ्यामध्ये क्रोमियम आणि इतर खनिजे असतात, जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतात. त्रिफळाचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेचे चढ-उतार नियंत्रित करण्यास मदत होते.
वजन कमी करते-
हिवाळ्यात, बहुतांश लोकांचा आहार बदलतो. ते जास्त गरम अन्न खातात आणि जंक फूडचा वापर देखील वाढतो. शारीरिक हालचाली कमी होण्यासोबतच हे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्रिफळा पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास, पचन सुधारण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत होते.
मेटाबॉलिज्म सुधारते-
हिवाळ्यात शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावते, ज्यामुळे गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचन समस्या उद्भवू शकतात. त्रिफळा पाण्यातील नैसर्गिक फायबर आणि पाचक गुणधर्म आतडे स्वच्छ करतात आणि पचन सुधारतात. हे पाणी दररोज पिल्याने शरीर डिटॉक्स होते, आतडे स्वच्छ होतात.
त्वचेच्या समस्या दूर करते-
त्रिफळा हे एक नैसर्गिक रसायन आहे. म्हणजेच त्यात पुनरुज्जीवन करण्याचे गुणधर्म आहेत. त्रिफळा हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ शकते आणि सुरकुत्या येऊ शकतात. त्रिफळा पाणी पिल्याने त्वचेचे पोषण होते, कोलेजन उत्पादन वाढते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






