युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांध्यांना सूज आलीय? ‘या’ पदार्थांच्या सेवनाने कमी होतील वेदना

Published:
युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढून सांधेदुखी होत असल्यास औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय ट्राय करता येतात.
युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांध्यांना सूज आलीय? ‘या’ पदार्थांच्या सेवनाने कमी होतील वेदना

Home remedies for uric acid:   वातावरण बदलताच अनेक आरोग्य समस्या उद्भवू लागतात. सध्या तर सतत ऊन, पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेकांना सांध्याच्या समस्या उद्भवत आहेत. या ऋतूमध्ये युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांच्या समस्या खूप वाढतात. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने सांधेदुखी, सूज येणे आणि चालण्यास त्रास होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अशा परिस्थितीत, शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करणे खूप महत्वाचे बनते. बहुतेक लोक युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी औषधे घेतात. परंतु तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय देखील वापरून पाहू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत, जे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

दालचिनी-

यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकता. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीची चहा पिल्याने यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित होण्यास मदत होते.

त्रिफळा-

यूरिक अ‍ॅसिडच्या वाढीच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही त्रिफळा सेवन करू शकता. त्यात अमीनो अ‍ॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा पावडर घेऊ शकता. त्याचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूज दूर होऊ शकते.

कडुलिंब-

आयुर्वेदात शतकानुशतके अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जात आहे. ते युरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून आराम देऊ शकते. खरं तर, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पेस्ट वापरल्याने युरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

हळद-

हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संधिवाताच्या वेदना कमी होण्यास मदत होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने तुम्हाला यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. याशिवाय, सांधेदुखी आणि सूज दूर करण्यासाठी तुम्ही हळदीची पेस्ट देखील लावू शकता.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews