शाकाहारी लोकांनी घरच्या घरी बनवा एगलेस केक, एकदम सोपी आहे रेसिपी

Published:
अनेकांना केकमध्ये अंडी असतात म्हणून केक खायला आवडत नाही. परंतु तुम्ही आमची एगलेस केकची चविष्ट रेसिपी ट्राय करून पाहू शकता.
शाकाहारी लोकांनी घरच्या घरी बनवा एगलेस केक, एकदम सोपी आहे रेसिपी

 Eggless Cake Marathi Recipe:   केक खायला सर्वांनाच आवडते. अनेक लोक विविध प्रकारचे केक ट्राय करत असतात. केकमध्ये अंडीसुद्धा वापरतात. त्यामुळेच काही लोक शाकाहारी असल्याने केक खाणे टाळतात. त्यामुळे अनेकांना घरी केक बनवण्याची इच्छा असते. परंतु योग्य रेसिपी माहिती नसते. अशा परिस्थिती तुम्ही आता बिना अंड्याचा केक घरीच बनवू शकता. आम्ही तुम्हाला एगलेस केकची एकदम सोपी रेसिपी सांगणार आहोत.

 

एगलेस केक बनवण्यासाठी साहित्य-

 

-२ कप  मैदा

-१ कप पिठी साखर

-१/२ कप कंडेन्स्ड मिल्क

-१/२ कप दूध

-१ कप बटर

-१ टीस्पून बेकिंग पावडर

-१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स

-१ कप मनुके

-१/२ कप ड्रायफ्रूट्स

-५ वेलची

-१० चेरी

-२० सोललेले बदाम

-१/२ कप अक्रोड

 

एगलेस केक बनवण्याची रेसिपी-

 

-एगलेस केक बनवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अक्रोड, मनुका आणि वेलची घ्यायची आहे आणि ते चांगले स्वच्छ करावे लागतील. तुम्हाला ते बारीक करून पावडर बनवावी लागेल. येथे, तुम्हाला बेकिंग पावडर आणि मैद्याचे मिश्रण देखील बनवावे लागेल. आता बटर वितळवा आणि या मिश्रणात घाला, पिठी साखर आणि कंडेन्स्ड मिल्क चांगले मिसळा.

-आता अक्रोड, मनुका आणि वेलची पावडर घातल्यानंतर, बदाम आणि अक्रोडाचे तुकडे, ड्रायफ्रूट्स आणि व्हॅनिला एसेन्स मिसळा आणि चांगले फेटून घ्या. जर हे मिश्रण घट्ट झाले तर त्यात थोडे दूध घाला.

-आता तुमचे एगलेस केक मिश्रण तयार आहे.  ते फक्त प्रक्रिया करायचे आहे. यासाठी तुम्हाला केक बनवण्याचे भांडे घ्यावे लागेल आणि त्यात थोडे वितळलेले बटर घालून ते भांड्याभोवती लावावे लागेल, नंतर त्यात केकचे मिश्रण ठेवावे लागेल आणि कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये ५-७ मिनिटे ठेवावे लागेल. आता केक मायक्रोवेव्हमधून बाहेर काढा आणि त्यावर चेरी, बदाम, काजू आणि मनुकाचे तुकडे ठेवून सजवा.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews