Marathi News

सकाळी-सकाळी करा ‘हे’ ४ काम, दूर होईल व्हिटॅमिन डी ची कमतरता

Published:
बहुतांश लोक सूर्यप्रकाशात जाणे टाळतात. दिवसभर बंद खोल्यांमध्ये बसल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सकाळी-सकाळी करा ‘हे’ ४ काम, दूर होईल व्हिटॅमिन डी ची कमतरता

How to get Vitamin D:  आजकाल निरोगी राहणे हे एका मोठ्या आव्हानासारखे आहे. निरोगी आहार आणि व्यायाम आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. निरोगी आहारामुळे सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. आजकाल व्हिटॅमिन डीची कमतरता अधिक सामान्य होत चालली आहे. लोक सूर्यप्रकाशात जाणे टाळतात. दिवसभर बंद खोल्यांमध्ये बसल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस पांढरे होणे आणि केस गळणे, थकवा, पाठ आणि हाडे दुखणे आणि जखमा बऱ्या होण्यास उशीर होऊ शकतो.

परंतु तुमच्या काही सवयी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सकाळच्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करून निरोगी ठेवण्यास मदत करतील….

उन्हात बसने-
तुम्हाला माहितेय का व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन म्हटले जाते. कारण शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून ते तयार करते. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतचा वेळ हा सर्वोत्तम असतो.जेव्हा सूर्याची किरणे तितकी तीव्र नसतात. त्वचेला नुकसान होण्याचा धोका देखील कमी असतो.

व्हिटॅमिन डी समृद्ध आहार-
तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा. अंड्याचा पिवळा भाग, मशरूम, फोर्टिफाइड दूध आणि तृणधान्ये आणि मासे (जसे की सॅल्मन आणि ट्यूना) हे व्हिटॅमिन डीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. तुमच्या नाश्त्यात हे आवर्जून सामील करा.

व्यायाम करा-
जर तुम्ही सकाळी घरात व्यायाम करत असाल तर तुम्ही ही सवय ताबडतोब बदलली पाहिजे. बाहेर, टेरेस, बाल्कनी किंवा उद्यानात व्यायाम करा. यामुळे दोन फायदे होतील. पहिले म्हणजे, शरीर सक्रिय राहील आणि दुसरे म्हणजे, सूर्यकिरणांमधून व्हिटॅमिन डी देखील चांगले मिळू शकते.

सनस्क्रीनचा जास्त वेळ वापर टाळा-
सनस्क्रीन आपल्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते यात काही शंका नाही. परंतु, ते व्हिटॅमिन डीचे उत्पादन देखील कमी करू शकते. जर तुम्ही फक्त १५-२० मिनिटे उन्हात राहणार असाल तर त्या काळात सनस्क्रीन लावू नका. त्यानंतरच सनस्क्रीन वापरा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews