Marathi News

गरोदरपणात काय खाऊ नये? कोणते पदार्थ तुमच्या बाळासाठी ठरू शकतात हानिकारक?

Published:
गरोदरपणात टाळायचे हे 'पदार्थ, चुकूनही खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम!
गरोदरपणात काय खाऊ नये? कोणते पदार्थ तुमच्या बाळासाठी ठरू शकतात हानिकारक?

प्रेग्नेंट आहोत हे समजता क्षणी आता आपल्या बाळासाठी काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे आपलं बाळ निरोगी आणि हेल्दी होईल, असा प्रश्न प्रत्येक गरोदर महिलेला पडतो. गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या दरम्यान स्त्रीला तिच्या आहार आणि लाईफस्टाईलची खूप काळजी घ्यावी लागते. गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. या दरम्यान चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ ज्याचे सेवन गर्भधारणेदरम्यान महिलांना हानिकारक ठरू शकते.याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

गरोदरपणाच्या काळात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

पपई

गरोदरपणाच्या काळामध्ये पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो विशेष करून जर पपई कच्ची असेल तर ती अजिबातच खाऊ नये, तसे पाहायला गेले तर कच्च्या पपई मध्ये पपेन नावाचे एक तत्व असते जे आपल्या शरीरातील गर्भात वाढणाऱ्या बाळाला जन्मजातच दोष आणि अन्य प्रकारच्या समस्या निर्माण करतात सोबतच या घटक तत्त्वामुळे गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा वाढते परिणामी बाळाच्या जीवाला धोका उद्भवतो.

खजूर

खजुरामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि आवश्यक पोषक घटक असतात. पण, गर्भवती महिलांना खजूर न खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर शरीरातील उष्णता वाढवते आणि त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन देखील होऊ शकते. म्हणून दररोज एक किंवा दोन खजूर खाणे चांगले आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात खजुराचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरते.

मेथी

मेथी बहुतेक भारतीय पदार्थांमध्ये वापरली जाते. परंतु मेथीमुळे गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी ते खाणे टाळावे. यामध्ये गर्भाशयात मजबूत आकुंचन निर्माण करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती होऊन गर्भपात होण्याचा धोका असतो.

जास्त कॅलरी असणारे पदार्थ

महिलांनी गरोदरपणाच्या काळात ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी समाविष्ट असते, असे पदार्थ खाऊ नये.
हे पदार्थ खाल्ल्याने महिलांचे वजन वाढते. पण त्याचबरोबर गरोदरपणामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हेच कारण भविष्यात गर्भपाताचा धोका सुद्धा उद्भवू शकतो. म्हणून गर्भवती असताना महिलेने कमी शिजलेले मांस, सी-फूड, प्रक्रिया केलेले मांस, जास्ती तळलेले पदार्थ किंवा भाजलेली मास खाऊ नये.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews