कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जास्त थंडी वाजते? ‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळतो उबदारपणा

Published:
चांगल्या आरोग्यासाठी शरीरात विविध मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जास्त थंडी वाजते? ‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळतो उबदारपणा

Which vitamin deficiencies cause cold:  हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. कडाक्याची थंडी पडत आहे. अशात अनेक आरोग्य समस्या त्रास देत असतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे हंगामी आजार उद्भवतात. तसेच हिवाळ्यात थंडी वाजणे हे सामान्य आहे. परंतु अनेकांना इतरांपेक्षा अधिक थंडी वाजत असते. अशावेळी हे शरीरातील काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

चांगल्या आरोग्यासाठी शरीरात विविध मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. परंतु या पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यास, अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आज आपण जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेने जास्त थंडी वाजते. आणि या व्हिटॅमिन्स ची कमतरता दूर करण्यासाठी काय-काय खावे…..

 

व्हिटॅमिन डी-

व्हिटॅमिन डी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन डी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती राखण्यास मदत करते. परंतु हिवाळ्यात उन्हाच्या अभावामुळे अनेकदा व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते. त्यामुळे शरीर उबदारना टिकवून ठेवण्यास सक्षम नसते. अशावेळी काही पदार्थ खाऊन त्याची कमतरता दूर करता येते. यासाठी आहारात दूध, दही, अंडी, सॅल्मोन फिश, मॅकरेल फिश यासांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.

 

व्हिटॅमिन सी-

शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर प्रभाव पडतो. त्यामुळे शरीरात उष्णता कमी निर्माण होते. त्यामुळे जास्त प्रमाणात थंडी वाजते. अशावेळी संत्री, लिंबू, चेरी, ब्ल्यूबेरी अशी सिट्रिक फळ खाणे फायदेशीर असते.

व्हिटॅमिन बी १२-
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा आणि शरीरात उबदारपणाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अधिक थंडी वाजण्याची समस्या जाणवते. यासाठी आहारात चिकन, मटण, अंडी, मासे अशा पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर असते.

व्हिटॅमिन ई-
व्हिटॅमिन ई हे एक महत्वाचे अँटी ऑक्सीडेन्ट आहे. जे शरीरातील नसांना संरक्षण देते आणि शरीरातील तापमान नियंत्रित करते. त्यामुळेच या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी अधिक वाजते. यासाठी आहारात पालक, ब्रोकोली, सुरफुलाच्या बिया, बदाम, अक्रोड आणि ऑलिव्हसारखे पदार्थ खावेत.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews