भगवान शंकराशी संबंधित हे ४ योगासन तुम्हाला सदैव निरोगी ठेवतील! मोक्षाचा मार्ग मिळेल

Last Updated:
भगवान शंकराशी संबंधित हे ४ योगासन तुम्हाला सदैव निरोगी ठेवतील! मोक्षाचा मार्ग मिळेल

भगवान शंकराला आदियोगी देखील म्हणतात. हिंदू धर्मानुसार, भोलेनाथ म्हणजेच शिव हेच पहिले योगी मानले जातात. असे मानले जाते की, शंकराने सृष्टीला योगाचे ज्ञान दिले आणि आज तेच योग संपूर्ण जगात वैद्यकीय उपचारांच्या प्रभावी माध्यमापैकी एक म्हणून ओळखले जाते. दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

शास्त्रांनुसार शिव म्हणतात, की मनुष्य हा प्राणी आहे. या पशुत्वाला समजून घेणे ही योग आणि तंत्राची सुरुवात आहे. मोक्ष आणि ईश्वरप्राप्तीचे मार्ग योगामध्ये लपलेले आहेत. येथे आम्ही तुम्हाला भगवान शंकराशी संबंधित ४ योगासन सांगणार आहोत जे माणसाला नेहमी निरोगी ठेवण्यास मदत करतात.

लिंग मुद्रा

लिंग हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘प्रतीक’ किंवा ‘रूप’ असा होतो. ही मुद्रा शरीरातील अग्नी तत्त्वाचे संतुलन राखण्यासाठी ओळखली जाते. या मुद्रेमुळे अस्थमा, वाढते वजन, आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारख्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.

हनुमानासन

हनुमान हे भोलेनाथांचेच अवतार मानले जातात. जसे हनुमान अतिशय बलवान होते, तसेच या आसनाच्या सहाय्याने हाडे बळकट होतात. यामुळे मन शांत राहते आणि मानसिक तणाव दूर होतो. तसेच चित्त एकाग्र होण्यास मदत होते.

शांभवी मुद्रा

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवांनी देवी पार्वतीला ही मुद्रा शिकवली होती. ही मुद्रा स्त्री शक्ती जागृत करण्यास मदत करते. शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन राखण्यास उपयोगी पडते. नियमित सरावाने व्यक्ती आपल्या ध्येयाकडे यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो.

नटराजासन

शिवांचे एक नाव नटराज देखील आहे आणि याच नावावरून या आसनाला नटराजासन असे नाव देण्यात आले आहे. हे सृष्टीच्या नृत्यात्मक ऊर्जाचे प्रतीक आहे. प्राचीन शास्त्रांमध्येही या आसनाचा उल्लेख आहे. हे आसन नियमित केल्याने मानसिक एकाग्रता वाढते, शरीर संतुलित राहते आणि योगी-ऋषिंप्रमाणे आरोग्य टिकवता येते.

Follow Us :GoogleNews