“आमचे तोंड काय? पाठपण पोळलेय”, मनसैनिका-शिवसैनिकांच्या मनोमिलनावर काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
२०१४ आणि २०१७ साली युतीचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमची फसवणूक केली गेली. त्यामुळं आता दुधाने तोंड पुळल्यामुळं ताकही फुंकून प्यावे लागते.
“आमचे तोंड काय? पाठपण पोळलेय”, मनसैनिका-शिवसैनिकांच्या मनोमिलनावर काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

MNS-Shivsena – महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे नेते आणि ठाकरे घराण्यातील दोन बंधू एकत्र येणार का, यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. आमच्यातील वाद हे क्षुल्लक आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत. असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

राज ठाकरेंच्या वाढदिवशी रक्तदान शिबिर…

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 14 जून रोजी वाढदिवसानिमित्त पक्षाकडून राज्यभरात विविध कार्यक्रम करण्यात आले. तर मुंबईतील वरळी येथे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांचे मनोमिलन झाल्याचे पाहयला मिळाले. संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना आमंत्रण देण्यात आले होते. दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का?, यावरुन चर्चांना उधाण आलं असताना दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे पाहयला मिळाले.

ताकही फुंकून प्यावे लागते…

दुसरीकडे हे दोन भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न संदीप देशपांडेंना विचारला असता, आम्ही २०१४ आणि २०१७ साली युतीचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमची फसवणूक केली गेली. त्यामुळं आता दुधाने तोंड पुळल्यामुळं ताकही फुंकून प्यावे लागते. तसेच मी किंवा किशोरी पेडणेकर एकत्र येण्यावर ठरवत नाही. तर ते वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

आमची पाठपण पोळलेय…

काही गोष्टीला विचार आम्हालाही करावा लागतो. कारण ज्या पदधतीने पक्षात फ्रिडम दिल्यानंतर प्रचंड संपत्ती मिळवल्यानंतर काय होतं. ती पाठ आणि तोंड आमचेही पोळले आहे. त्यामुळं आम्हीही त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतोय. आणि कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा उत्साह पाहता आमच्यासारख्यांचाही पाठिंबा आणि एकत्र येण्यावरुन समर्थन असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.