गणेशोत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार 250 विशेष गाड्या

Written by:Rohit Shinde
Published:
गणेशभक्तांच्या सोयीसाठी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान 250 विशेष गाड्या चालवल्या जातील. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार 250 विशेष गाड्या

श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २५० गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्या साधारणपणे 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी 24 जुलैपासून आरक्षण करता येणार आहे.

250 विशेष रेल्वे गाड्या धावणार

मध्य रेल्वे मुख्यालयाने ही सूचना जारी केली. अधिसूचनेत असे सांगण्यात आले की २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. यामुळे गणेशोत्सवादरम्यान गर्दी कमी होईल. अधिसूचनेत कोकण रेल्वेचे पत्र आणि रेल्वे बोर्डाची मान्यता देखील उद्धृत करण्यात आली आहे. मध्य रेल्वेची ही सूचना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मध्य रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांच्या कोचिंग अधिसूचनेनुसार, सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी, सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी, एलटीटी-मडगाव-एलटीटी, पुणे-रत्नागिरी-पुणे मार्गांवर गाड्या धावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी काही मार्गांवर दररोज धावतील आणि काही मार्गांवर साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जातील.

विशेष गाड्यांचे नियोजन कसे?

०११५१ विशेष ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ जुलै ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता पोहोचेल.

०११५२ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ३.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता पोहोचेल.

०११०३ विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता पोहोचेल.

०११०४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २३ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी संध्याकाळी ४.४० वाजता पोहोचेल.

०११५३ विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री ८. १० वाजता पोहोचेल.

०११५४ विशेष ट्रेन रत्नागिरी येथून २३ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.

०११६७ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान रात्री ९ वाजता दररोज सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता पोहोचेल.

०११६८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ११. ३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री १२ . ४० वाजता पोहोचेल.

०११७१ विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसहून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८.२० वाजता दररोज सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल.

०११७२ विशेष ट्रेन सावंतवाडी रोड येथून २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री १०. ३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल.

०११२९ साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार २६ ऑगस्ट , २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री १० .२० वाजता पोहोचेल.

०११३० साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार २६ ऑगस्ट , २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११ .२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.

०११८५ साप्ताहिक विशेष ट्रेन बुधवार २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२ .४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल.

०११८६ साप्ताहिक विशेष ट्रेन बुधवार २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५० वाजता पोहोचेल.

०११६५ वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवारी २६ ऑगस्ट ,२ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२ .४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल.

०११६६ वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून प्रत्येक मंगळवारी २६ ऑगस्ट , २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५० वाजता पोहोचेल.

०१४४७ साप्ताहिक विशेष ट्रेन शनिवार २३ऑगस्ट ३० ऑगस्ट व ६. सप्टेंबर रोजी पुणे येथून रात्री १२ .२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११ .५० वाजता पोहोचेल.

०१४४८ साप्ताहिक विशेष ट्रेन शनिवार २३ ऑगस्ट , ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून संध्याकाळी ५ .५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचेल.

०१४४५ वातानुकुलित साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार, २६ ऑगस्ट , २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी पुणे येथून रात्री १२ .२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहोचेल.

०१४४६ वातानुकुलित साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार, २६ ऑगस्ट , २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून संध्याकाळी ५ . ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचेल.

०११५५ मेमू विशेष गाडी दिनांक २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दिवा येथून दररोज सकाळी ७.१५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल.०११५६ मेमू विशेष गाडी दिनांक २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान चिपळूण येथून दररोज दुपारी ३ ३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० .५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews