Shiva Srushti plan – काही महिन्यांपूर्वी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. यानंतर सरकारने याच ठिकाणी महाराजांचा पुतळा बसविला आहे. यानंतर मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी मंत्री आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली होती. अखेर या राणेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अर्थ विभागाने मान्यता दिली आहे.
शिवसृष्टीचे सादरीकरण…
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे पर्यटनाला भरघोस चालना मिळत आहे. पर्यटकांचा तेथे ओघ पाहता पुतळ्याच्या आजुबाजूचा परिसर सुशोभीत करून शिवसृष्टी उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील व आग्रही होती. यावर काल झालेल्या बैठकीत संभाव्य शिवसृष्टीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच याठिकाणी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली होती. याला अखेर मान्यता मिळाली आहे.
शिवसृष्टीला ८३.४५ कोटी रुपये खर्च…
दुसरीकडे या शिवसृष्टीला अंदाजे ८३.४५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत असून आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे .पालकमंत्री नितेश राणे यांनी ही शिवसृष्टी लवकर होण्यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी केलेली सादरीकरण पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ही शिवसृष्टी उभारतांना तेथील वाऱ्याच्या वेगाचा विचार करून शिवसृष्टीची निर्मिती करावी, असे निर्देश ही उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले. याबाबत झालेल्या बैठकीला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री नितेश राणे व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.





