Ladki bahin yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यानंतर आता एक वर्ष पूर्ण होत असताना या योजनेत चुकीच्या मार्गाने गैरमार्गानेही लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्यात. पण ज्यांनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतलाय, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार नक्कीच पाऊले उचलेल, असं तटकरेंनी सांगितले.
पडताळणी करण्यास सुरु…
क्रॉस व्हेरिफाय करायला ज्या वेळेला सात-साडेसात लाखाचा डेटा त्यांनी दिला, त्यावेळेला त्यातील पाच लाख खरंच शेतकरी लाभार्थी आहेत हे सांगितले. त्याच्यामुळे जो काही हा 26 लाखाचा डेटा आलेला आहे. याचा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेव्हलपर्यंत होणार आहे. आणि त्याच्यातून किती आकडे समोर येतात हे समजेल. मात्र जे पात्र आहेत, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचला पाहिजे पात्र व्यक्ती अपात्र ठरता कामा नये, पात्र लोकांना याचा लाभ मिळाला पाहिजे, असं तटकरे म्हणाल्या.
रक्कम रिकव्हरी करणार…
दरम्यान, या योजनेत रेगुलरिझेशन पाहिजे. आणि चुकीचे प्रकार थांबवण्यासाठी विभाग किंवा शासन योग्य ती पाऊल उचलत असेल, तर त्याबाबत कोणाची हरकत नसली पाहिजे. लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, आता चुकीच्या लाभार्थ्यांनी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडून ती रक्कम रिकव्हरी करण्याबाबत शासन कटीबद्ध आहे, अशी माहिती अदित तटकरेंनी दिली. साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा 26 लाखाचा डेटा विभागाकडून क्रॉस व्हेरिफाय करणं आहे.
ग्राउंड लेव्हलची स्क्रुटीनी…
हा डेटा दिल्यानंतर याची ग्राउंड लेव्हलची स्क्रुटीनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती? अपात्र किती? याची पडताळणी सुरु आहे. लाडकी बहीण योजनेची नोंदणी झाली तेव्हा 2.63 करोडपेक्षा जास्त नोंदणी झालेली होती. आणि त्यातून साधारणपणे 2 कोटी 47 लक्ष महिलांना लाभ दिला आहे. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा रजिस्ट्रेशनचा डेटा ऑलरेडी स्कुटीनी केलेला होता. असं तटकरेंनी सांगितले.





