कथित हनी ट्रॅपप्रकरणाचे विधानसभेत पडसाद, नाना पटोलेंचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

Written by:Smita Gangurde
Published:
हनीट्रॅप प्रकरणात ठाण्याची महिला केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील हॉटेल चालक आणि ब्युटीपार्लर महिलेचा पोलीस जबाब घेणार आहेत.
कथित हनी ट्रॅपप्रकरणाचे विधानसभेत पडसाद, नाना पटोलेंचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राजकारणी आणि बडे अधिकारी अडकले असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे विधिमंडळात जोरदार पडसाद उमटले. काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी भरविधासभेत पेनड्राईव्ह दाखवून बॉम्बगोळा फोडला

राज्यातील आजीमाजी मंत्री, बडे अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेत, असा आरोप पटोलेंनी केलाय. काही नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह त्यांनी सभागृहात दाखवत धमाका केला. तर विधानपरिषदेत अंबादास दानवेंनीही हनी ट्रॅपप्रकरणी खळबळजनक दावे केलेत

मुंबई, ठाणे, नाशकात पाळमुळं

मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये या हनी ट्रॅपची पाळमुळं असल्याचं सांगण्यात येतंय. शासकीय गुप्ततेचा भाग आणि ब्लॅकमेलिंग मधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतलाय. अधिकारी आणि राजकीय लोकांच पण नाव घेतलं जात आहे.
ब्लॅकमेलिंग करून काही प्रशासकीय लाभ घेतल्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय.

काय आहे हनी ट्रॅप प्रकरण?

राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही राजकारणी या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे याप्रकरणी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, आणि संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरात गुप्त चौकशीसह तपास सुरू करण्यात आलाय. हनी ट्रॅप प्रकरण सरकार गांभीर्यानं हाताळत असल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं

हनी ट्रॅपमध्ये कशी फसवणूक?

हनीट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर
काढण्याचा मार्ग समजला जातो. हनीट्रॅपमध्ये
बडे सरकारी अधिकारी, मंत्र्यांना टार्गेट गेलं जातं. खास करून या मिशनमध्ये सुंदर
महिलांचा वापर होतोया प्रकारात एखाद्या
व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात. महत्त्वाची कागदपत्रं, गोपनीय माहिती,
शासकीय धोरणांची माहिती मिळवली जाते
हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारी कंत्राटं मिळवली जातात, राजकीय लाभ
उचलला जातो मोठ्या प्रमाणात
पैसे उकळण्यासाठी
हनीट्रॅपचा वापर

हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकले?

राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, बडे राजकीय नेते हनी ट्रॅपमध्ये अडकलेत. नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलात बोलावून ट्रॅपमध्ये अडकवले.अधिकारी, राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओही असल्याची माहिती आहे. विविध पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अत्याचाराच्या तक्रारी. हनीट्रॅप प्रकरणात कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती आहे. खंडणी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यातील तक्रारी मागे घेण्यात आल्या. हनीट्रॅप प्रकरणात ठाण्याची महिला केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. नाशिकमधील हॉटेल चालक आणि ब्युटीपार्लर महिलेचा पोलीस जबाब घेणार आहेत.

नाना पटोलेंच्या पेन ड्राईव्हमध्ये काय?

राज्यातील हनी ट्रॅपच्या धागेदोऱ्यांचा तपास करण्यासाठी सरकारनं पावलं उचललीत
तपासाबाबत गोपनीयता पाळण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. या हनीट्रॅप प्रकरणात ठाण्याची महिला केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे

हनीट्रॅपप्रकरणी नाना पटोलेंनी भर सभागृहात पेनड्राईव्ह दाखवून या प्रकरणाला नवी धार दिली. या पेनड्राईव्हमध्ये काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीय. विधानसभा अध्यक्षांनीही या आरोपांतील तथ्य तपासण्याचे आदेश सरकारला दिलेत. पण जर यात बडे सरकारी अधिकारी, आजीमाजी मंत्री अडकलेले असल्यास पुढं काय होणार हे पाहावं लागणार आहे.

Follow Us :GoogleNews