रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्य सरकारांच्या सहकार्याने सर्व बँकांची सुट्ट्यांची यादी तयार करते आणि ती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक करते. देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. या व्यतिरिक्त ज्या सुट्ट्या बँकांना असतात, त्यांची यादी समोर येत असते. नोव्हेंबर महिन्यात देशभरातील बँकांच्या सुट्ट्या नेमक्या कशा राहतील, त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…
नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या
नोव्हेंबर महिन्यात देशभरातील बँका तब्बल नऊ ते 10 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामांचं आधीच नियोजन करणं फायद्याचं ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यादीत राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण, तसेच साप्ताहिक सुट्ट्या दोन्ही प्रकारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. या सुट्ट्या राज्यनिहाय बदलत असतात, त्यामुळे ग्राहकांनी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्टीची यादी नक्की पाहावी, असा सल्ला RBI ने दिला आहे.
1 नोव्हेंबरला शनिवारी कन्नड राज्योत्सवामुळे कर्नाटकात सर्व बँका बंद राहातील. तर उत्तराखंडमध्ये इगस-बाघवालमुळे बंगळुरू आणि देहरादूनमधील बँका बंद राहाणार आहेत. 5 नोव्हेंबरला बुधवारी गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रास पौर्णिमेनिमित्त देशभरातील अनेक ठिकाणी बँका बंद राहतील. यात यादीत ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर या शहरांचा समावेश आहे.
बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा
| दिनांक | वार | सुट्टी |
| 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार | कन्नड राज्योत्सव / इगस-बाघवाल (राज्यनिहाय सुट्टी) |
| 2 नोव्हेंबर 2025 | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
| 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार | गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा |
| 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार | दुसरा शनिवार – बँक सुट्टी |
| 9 नोव्हेंबर 2025 | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
| 16 नोव्हेंबर 2025 | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
| 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार | चौथा शनिवार – बँक सुट्टी |
| 23 नोव्हेंबर 2025 | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
| 30 नोव्हेंबर 2025 | रविवार | साप्ताहिक सुट्टी |






