Marathi News

कोकणातील समुद्र किनाऱ्यावर जाताय? सावधान! किनाऱ्यांवर जेली फिशमुळे धोका

Written by:Rohit Shinde
Published:
वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर जाताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर जाताय? सावधान! किनाऱ्यांवर जेली फिशमुळे धोका

किनाऱ्यावरील जेलीफिशचे धोके खूप गंभीर असू शकतात. समुद्रकिनाऱ्यावर लाटा ओसरल्यानंतर अनेकदा जेलीफिश पाण्याबाहेर येतात आणि वाळूवर पडलेल्या अवस्थेत दिसतात. हे प्राणी मृत वाटले तरी त्यांच्या टेंटॅकल्समध्ये (शृंगिका) विष असते. यामुळे अनेक गंभीर परिणाम खरंतर होत असतात. रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत.

कोकणातील किनाऱ्यांवर जेली फिश, सावधान !

वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत. या जेली फिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असं देखील म्हटलं जातं. दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रूतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे. जली फिश प्रचंड विषारी असतात, त्यांचा अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते, त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचं आवाहान करण्यात आलं आहे.

मोठ्या संख्येनं जेली फिश समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन,सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड या  किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून आले आहेत, त्यामुळे नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जेली फिशमुळे होईल गंभीर इजा, सावध व्हा !

किनाऱ्यावरील जेलीफिशचे धोके खूप गंभीर असू शकतात. समुद्रकिनाऱ्यावर लाटा ओसरल्यानंतर अनेकदा जेलीफिश पाण्याबाहेर येतात आणि वाळूवर पडलेल्या अवस्थेत दिसतात. हे प्राणी मृत वाटले तरी त्यांच्या टेंटॅकल्समध्ये (शृंगिका) विष असते. त्या त्वचेवर लागल्यास तीव्र जळजळ, सूज, खाज, वेदना आणि काही वेळा अॅलर्जिक प्रतिक्रिया किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

काही प्रजातींचे विष अत्यंत तीव्र असल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. पर्यटकांनी समुद्रात उतरताना किंवा किनाऱ्यावर चालताना सावधगिरी बाळगावी, तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जेलीफिश चावल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews