Marathi News

Soyabean Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; सध्याचे बाजारभाव काय ?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे.
Soyabean Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; सध्याचे बाजारभाव काय ?

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे.

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तफावत

30 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळाली. सिल्लोड बाजार समितीत 15 क्विंटल एवढी आवक झाली असून येथे सोयाबीनला 4000 ते 4400 रुपये असा भाव मिळाला. सर्वसाधारण दर 4200 रुपये नोंदला गेला. गुणवत्तेनुसार दरात किंचित वाढ दिसत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. कन्नड बाजारात आवक 27 क्विंटल झाली. येथे दर 3800 ते 4100 रुपयांच्या दरम्यान राहिला. सर्वसाधारण दर 3950 रुपये मिळाला असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

राहुरीत स्थानिक सोयाबीनची 45 क्विंटल आवक झालीयेथे किमान दर 3500 रुपये नोंदला गेला तर चांगल्या प्रतीच्या मालाला 4350 रुपये भाव मिळाला. 3925 रुपयांवर सर्वसाधारण दर स्थिर राहिला. मागणी मध्यम असल्याने दरात मोठी वाढ झाली नाही. वरूड बाजारात 132 क्विंटल सोयाबीनची मोठी आवक झाली. येथे दर 3460 ते 4575 रुपयांपर्यंत पोहोचला. सर्वसाधारण दर 3570 रुपये नोंदला गेला. आवक जास्त असूनही काही उच्च प्रतीच्या मालाला चांगला दर मिळाला आहे.

वरोरा-शेगाव बाजार समितीत दरांमध्ये मोठा फरक पाहायला मिळाला.  66 क्विंटल आवक असून किमान दर फक्त 600 रुपये तर जास्तीत जास्त 3600 रुपये इतका राहिला. सर्वसाधारण दर 2000 रुपयांवर थांबला. निकृष्ट प्रतीचा माल मोठ्या प्रमाणावर आल्याने किमान दर मोठ्या प्रमाणात घसरल्याची माहिती मिळते.

सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews