पाणी पुरवठा बंद राहणं, ही बाब मुंबईकरांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असते. आता त्यासंदर्भाने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही दुरूस्ती आणि जोडणीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद असणार आहे, अशी माहिती जलव्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
कुठे बंद राहणार पाणी पुरवठा?
कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत 900 मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे तसेच 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, 2 जून 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपासून मंगळवार, 3 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे.
पाणी पुरवठा बंद राहण्याचे कारण?
मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठा सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडप बसविण्याच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून तसेच काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यासोबतच आवश्यक पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. त्यामुळे या दिवसांत मुंबईच्या संबंधित भागांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.






